Live Death Video Meerut :  मृत्यू ही अशी गोष्ट आहे की, जी आजवर कोणाला चुकलेली नाही. मात्र, हल्ली अचानक मृत्यूशी गळाभेट होण्याच्या अनेक घटना घडत आहेत. चालता-बोलता माणूस पुढच्या क्षणी कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला, अशा काही घटना तुम्ही स्वत: ऐकल्या असतील. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात एक तरुण स्विमिंग पूलमधून पोहून बाहेर आला आणि क्षणार्धात त्याला मृत्यूने गाठले. ही हृदयद्रावक घटना स्विमिंग पूलजवळील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही घटना २१ जून रोजी उत्तर प्रदेशातील मेरठमधील सिवाल खास शहरात घडल्याचे सांगण्यात येत आहे. जिथे १७ वर्षांचा तरुण स्विमिंग पूलमधून पोहून बाहेर आला आणि त्यानंतर क्षणार्धातच त्याचा मृत्यू झाला. समीर असे या तरुणाचे नाव असून, तो क्रिकेट खेळल्यानंतर स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेला होता. सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तो तरुण पोहून अचानक तलावातून बाहेर आला आणि काही वेळातच जमिनीवर जोरात कोसळला.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

पुरुषांनो, चुकूनही मेट्रोच्या महिलांच्या डब्यामध्ये चढू नका; भरस्थानकावर होऊ शकते असे विचित्र स्वागत; पाहा video

समीर खाली पडल्याचे पाहून तेथे उपस्थित असलेले इतर काही तरुण त्याच्याजवळ धावत आले आणि त्याला उठविण्याचा प्रयत्न सुरू केला. एक व्यक्ती त्याला ओढत उन्हातून सावलीत घेऊन गेली. त्यानंतर त्या तरुणाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. समीरच्या मृत्यूची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, तो व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉक्टरांचे म्हणणे आहे की, समीरचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाला. समीरचा अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना मिळताच त्यांना मोठा धक्का बसला आहे.

बापरे! नदी ओलांडताना दगड समजून ठेवला प्राण्यावर पाय अन् पुढे जे घडलं ते फारच भयानक; पाहा video

आकस्मिक मृत्यूची अशी अनेक प्रकरणे यापूर्वीही समोर आली आहेत. कुणाचा रेस्टॉरंटमध्ये मृत्यू झाला, तर काहींचा नाचताना मृत्यू झाला. तर काहींनी क्रिकेट खेळताना जगाचा निरोप घेतला. नुकतीच मुंबईतील मिरा रोड येथून एक धक्कादायक घटना समोर आली होती; जिथे क्रिकेट खेळताना एका व्यक्तीने षटकार मारला. त्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. त्या घटनेचाही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Story img Loader