सर्व वयोगटातील लोकांना चॉकलेट खायला आवडते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच चॉकलेट खाण्यात उत्सुक दिसतात. चॉकलेट कधीही खाऊ शकतो आणि यामुळेच प्रत्येक उत्सवात त्याचा समावेश केला जातो. पण तुम्ही खाता ते पदार्थ स्वच्छ आहेत की नाही? याची काळजी घेणं खूप गरेजचं आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक चॉकलेट उत्पादने वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेच आली आहे. अशात कॅडबरीच्या चॉकलेट उत्पादनांमध्येही एक घातक व्हायरस आढळून आल्याची एक धक्कादायक माहिती समोर आली होती. मात्र आता चक्क कॅडबरीमध्ये आळी आढळल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पहून सर्वट थक्क झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता चॉकलेट खाताना विचार कराल

महिलेच्या हातात अर्धा खाल्लेला चॉकलेटचा तुकडा होता. हा तुकडा नीट पाहिल्यास त्यात एक किडा रांगताना दिसेल. हा किडा पाहिल्यानंतर लोकांनीही संताप व्यक्त केला आला. महिलेने अर्धे चॉकलेट खाल्ले होते. अशा परिस्थितीत आतमध्ये आणखी किडे असतील तर ते आता महिलेच्या पोटात गेले होते. आपण सगळे आवडीने खाणारे हे चॉकलेट जर अशाप्रकारे आपल्याकडे येत असेल तर, आता चॉकलेट किती सुरक्षित असा प्रश्न पडतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – घराच्या खिडकीवर ‘या’ गोष्टी कधीही ठेवू नका, घर सजवण्याच्या नादात होऊ शकतं नुकसान

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. @crabolita नावाच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेक कमेंट येत असून लोक संताप व्यक्त करत आहे. अशा घटना तुमच्यासोबतही घडू शकतात. त्यामुळे चॉकलेट खाताना सावधानता बाळगण्याची गरज आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Live larvae found in chocolate cadbury bite shocking video viral on socail media srk
Show comments