VIRAL PHOTO: सोशल मीडियावर सध्या भयंकर घटनांचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. मजेशीर कंटेन्टसह काही अशा घटना सोशल मीडियावर आजकाल पाहायला मिळतात, ज्या पाहून धक्काच बसतो. सध्या अशीच एक घटना सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय, जी पाहून तुमचाही थरकाप उडेल.

समजा तुम्हाला खूप भूक लागलीय आणि तुम्ही नुकतीच दुकानातून खरेदी करून आणलेली खाऊची पिशवी उघडली. आता आनंदात सगळा खाऊ फस्त करणार या विचाराने तुम्ही ती उघडली आणि त्यात तुमच्या आवडत्या पदार्थाबरोबर तुम्हाला एक बेडूकही दिसला तर. तो बेडूक पाहून नक्कीच तुम्ही जोरात आरडाओरडा कराल, घाबरून जाल. असाच काहीसा प्रकार इंग्लंडमधील एका व्यक्तीबरोबर घडला, जिथे त्या व्यक्तीने नुकतीच सुपरमार्केटमधून खरेदी केलेली सॅलेडची पिशवी उघडली आणि त्यात सॅलडस बेडूकपण सापडला. या घटनेचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

हेही वाचा… “उडे दिल बेफिकरे…”, धावत्या बाईकवर झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा हटके डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “त्याची नोकरी जायला…”

एका व्यक्तीला सॅलेडच्या पिशवीत बेडूक सापडल्यानंतर ब्रॅकनेल येथील वेट्रोज वितरण केंद्रातील कर्मचाऱ्यांनी परिसरातील प्राणी बचाव पथकाशी संपर्क साधला. बेडूक सापडलेल्या ग्राहकाने तक्रार केल्यावरच त्यांना सॅलेडच्या पिशवीत जिवंत बेडूक असल्याची माहिती मिळाली. लगेच त्यांनी पिशवी बाजूला ठेवली आणि मदतीसाठी बचावकर्त्यांना फोन केला.

याप्रकरणी बर्कशायर रेप्टाइल रेस्क्यूने या घटनेवर भाष्य केले आणि सांगितले की, एका ग्राहकाला सॅलेडच्या पिशवीत बेडूक सापडला आणि त्यांनी त्या सॅलेडची जिथून खरेदी केली होती तिथे तो परत केला.

आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी या घटनेचे वृत्त दिलं. तसंच त्यांनी बेडकाला वाचवणाऱ्या बचावकर्त्याशी संवाद साधला. बेडूक नक्की त्या पदार्थाच्या पिशवीत कसा गेला हे त्यांनी विचारलं. “तो कुठून आला याची मला कल्पना नाही, पण तो आता जिथे आहे तिथे आनंदी आहे. आम्ही त्याला आमच्याकडे ठेवणार आहोत,” असे बचावकर्ते ग्रॅहम मार्टिन यांनी बीबीसीला सांगितले.

हेही वाचा… VIDEO: भयंकर प्रकार! पिसाळलेल्या बैलाने धडक देताच स्कूटरचालक आला गाडीच्या खाली अन्…, पुढे जे घडलं ते पाहून उडेल थरकाप

हा व्हायरल झालेला फोटो @talker_news या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून त्याला “सॅलेडच्या सुपरमार्केट बॅगमध्ये बेडूक सापडला” असं कॅप्शन देण्यात आलं आहे.

दरम्यान, अलीकडच्या काळात अशा प्रकारच्या घटना आश्चर्यकारकपणे सामान्य झाल्या आहेत. जिथे लोकांना एखाद्या पार्सलमध्ये, फळांच्या पिशवीत किंवा भाज्यांमध्ये असे प्राणी आढळतात.