VIDEO: सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात, मात्र वाघाचेही जंगलात तेवढेच वर्चस्व असते. वाघ आणि सिंह यांची जंगलात आपली अशी एक दहशत असते. त्यामुळं फार क्वचितच वाघ आणि सिंह एकमेकांसमोर येतात. असाच एक वाघ-सिंहाच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कधी सिंह वाघावर तर कधी वाघ सिंहावर वरचढ ठरताना दिसत आहे. वाघ आणि सिंह यांच्यातील जबरदस्त लढाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपण बऱ्याचदा हे पाहातो की, मोठे शिकारी जसे की, वाघ, बिबट्या, सिंह इत्यादी आपलं पोट भरण्यासाठी जंगलातील प्राण्यांचा शिकार करतात. ते बऱ्याचदा शाकाहारी प्राण्यांची शिकार करतात. पण मांसाहारी प्राण्यांच्या वाट्याला ते कधीच जात नाही. मात्र व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सिंह आणि वाघ एकमेकांसमोर उभा असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं. सिंह काही पावलं मागे सरकतो आणि मग अचानक वाघावर जोरदार हल्ला करतो. सिंह वाघावर गर्जना करत हल्ला करतो. मात्र, वाघाने स्वतःला वाचवलं. तो आपल्या सर्व शक्तीनिशी सिंहाचा बदला घेतो. तो सिंहाच्या प्रत्येक हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करतो आणि लगेचच प्रत्युत्तर देतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: महिलेच्या पायाला गुंडाळून ३ तास बसला होता कोब्रा, न घाबरता महिला करत राहिली शंकराची पूजा अन्…

सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यात जंगली प्राण्यांचा व्हिडीओ म्हटलं की, बऱ्याच लोकांना ते पाहायला फार आवडतं. जेव्हा सोशल मीडियाचा काळ नव्हता तेव्हा आपल्याला टीव्हीवरती किंवा डिस्कवरी वरती जंगली प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला मिळायचे. परंतु आता सोशल मीडियावर आपल्या सगळ्या प्रकारचे कंटेन्ट पाहायला मिळतात. ज्यामध्ये जंगली प्राण्याचे व्हिडीओ देखील असतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Live video of tiger and lion fighting in jungle goes viral trending on social media srk