भारतात चहाप्रेमींची संख्या कमी नाही. त्यामुळे आपल्याला नाक्या- नाक्यावर एक तरी चहाची टपरी पाहायला मिळते. विशेषत: ऑफिसेस आणि कॉलेज परिसरात तुम्हाला हमखास चहाच्या अनेक टपऱ्या दिसून येतील. अशा ठिकाणी चहाप्रेमी ज्या स्टाईलमध्ये चहाचा आस्वाद घेत असतात ते पाहून कोणालाही चहा पिण्याची इच्छा होते. पण, उघड्यावर कुठेही ठेवलेल्या कपातील चहा पिणे टाळा. कारण- अशा प्रकारचा चहा क्षणार्धात विष बनू शकतो हे दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; ज्यात एक पाल आरामात कपातील चहा पिताना दिसत आहे. हा व्हिडीओ जरी हास्यास्पद वाटत असला तरी अशा प्रकारचा चहा पिऊन तुम्ही तुमचे आरोग्य धोक्यात घालू शकता.
याआधी तुम्ही पाल किडे खाताना पाहिली असेल; पण या व्हिडीओमध्ये एक पाल चक्क चहाचा आनंद घेताना दिसत आहे. दोन पायांवर उभी राहून ही पाल एका ठिकाणी ठेवलेल्या कपातील चहा चाटत आहे. हाच चहा जर एखादी व्यक्ती प्यायली असती, तर ती आजारी पडण्याची शक्यता होती. त्यामुळे उघड्यावर ठेवलेल्या कपातील चहा पिताना दहा वेळा विचार करा. कारण- पालीसारखे अनेक कीटक तो कप केव्हा चाटून गेले असतील, तर ते आपल्याला समजणारही नाही.
तुम्ही पाहिलं असेल की, अनेक रंगकाम करणारे पेंटर, मजूर किंवा मेहनतीची कामं करणारे लोक दिवसातून अनेकदा चहा पितात. यावेळी ते काम करता करता, कपातून चहाचा एक एक घोट पिताना कप कुठेही ठेवतात. अशा वेळी एखादी पाल त्या कपातील चहा केव्हा प्यायली असेल का याचा अंदाज त्यांनाही येणार नाही.
कारण- पावसाळ्यात पालीसह अनेक किडे घरात शिरतात. हे किडे उघड्यावर ठेवलेले पदार्थ खातात आणि त्यानंतर तेच पदार्थ तुम्ही खाल्ल्यास विषबाधा होण्याचा धोका वाढतो. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर युजर्स सातत्याने मजेशीर कमेंट्स करीत आहेत. एका युजरने लिहिलेय की, चहामध्ये मच्छर पडली असावी. त्याच वेळी दुसऱ्या युजरने लिहिलेय की, या चहामध्ये त्याचाही वाटा होता’. त्यामुळे चहाचे शौकीन असलेल्या लोकांनी हा व्हिडीओ बघावा आणि चहाचा ग्लास उघड्यावर कुठेही ठेवू नये.