Lizard Found Inside Amazon Parcel: आजकाल सगळ्याच गोष्टी ऑनलाईन झाल्याने अधिकतर लोकं प्रत्यक्षात बाजारात जाऊन खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन गोष्टी खरेदी करण्यास प्राधान्य देतात. घरच्या घरी फोनमधून दोन बटणं दाबली की आपल्याला हवी ती वस्तू आपल्या दारात येते. सोयी-सुविधा जशा वाढत गेल्या तसे यांचे दुष्परिणामही दिसू लागले.

ऑनलाईन वस्तू मागवल्या की नेहमीच त्या जशाच्या तशा येत नाहीत बरं का! कधी कधी त्या वस्तू खराब निघतात, तर कधी ग्राहकांबरोबर फ्रॉड होतो. सोशल मीडियावर अशाप्रकारचे अनेक व्हिडीओ व्हायरल तर होतच असतात परंतु काही व्हिडीओ धक्कादायक असतात. आपण अनेकदा ऑनलाईन मागवलेल्या वस्तूंमध्ये किडे, साप, गांडूळ अशाप्रकारचे प्राणी सापडलेले व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर पाहिले असतील असाच एक फोटो सध्या सोशल मी़डियावर तुफान व्हायरल होतोय.

Fossil footprints show life on earth
कुतूहल : खडकांवरच्या पाऊलखुणा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Zebra vs Crocodile fight video zebra escaped from crocodiles jaws netizens were shocked video goes viral
“नशीब नाही प्रयत्नांचा खेळ” मगरीच्या जबड्यातून असा निसटला झेब्रा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Video About Vadhvan Port
Vadhvan Port : वाढवण बंदर का महत्त्वाचं आहे? पाच वैशिष्ट्ये कुठली? लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं सखोल विश्लेषण
loksatta kutuhal interesting facts about the first dinosaur of india
कुतूहल : भारतातील पहिलावहिला डायनोसॉर
monkey
थेट एसटी बसच्या छतावर बसून माकडाचा ऐटीत प्रवास! Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “तिकीट काढले का?”
Snake Fighting With A Mongoose Who Will Win In The Jungle Battle Watch This Viral Video on social media
साप आणि मुंगूसामध्ये रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की
dinasorus highway
१६ कोटी वर्ष जुना ‘डायनासोर हायवे’ काय आहे? शास्त्रज्ञांना याचा शोध कसा लागला?

हेही वाचा… “चाचाने दिल जीत लिया”, मराठमोळ्या वयोवृद्ध रिक्षाचालकाचं इंग्रजी ऐकून व्हाल थक्क; VIDEO VIRAL होताच नेटकरी म्हणाले…

या भयानक घटनेत, कोलंबियातील एका महिलेने एअर फ्रायरची ऑनलाइन ऑर्डर दिली होती, तिच्या ऑर्डर केलेल्या एअर फ्रायरसह तिला त्या बॉक्समध्ये जिवंत सरडा सापडला. महिलेने खरेदी केलेले नवीन एअर फ्रायर बाहेर काढण्यासाठी बॉक्स अनपॅक करताच एअर फ्रायरसह तिला सरपटणारा प्राणी सापडला (Spanish Rock Lizard) यामुळे तिला जबरदस्त धक्का बसला.

व्हायरल पोस्ट (Lizard Found Inside Amazon Parcel Viral Post)

कोलंबियातील या महिलेचे नाव सोफिया सेरानो (Sofia Serrano) असे आहे. सोफियाने १६ जुलै रोजी या घटनेबद्दल तिच्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. त्या पोस्टमध्ये तिने या ऑर्डरच्या बॉक्सचा फोटो शेअर केला, ज्यात भलामोठा जिवंत सरडा दिसतोय. “मी ॲमेझॉनद्वारे एअर फ्रायरची ऑर्डर दिली होती आणि ती ऑर्डर एका साथीदारासह आली. मला माहित नाही की यात ॲमेझॉनची चूक आहे की वाहक कंपनीची” असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं.

पहिली पोस्ट शेअर केल्यानंतर सोफियाने पुन्हा एकदा ट्वीट करत लिहिलं की, “आम्हाला माहित आहे की या पार्सलची संपूर्ण जबाबदारी ॲमेझॉनची आहे. कारण जिथे एअर फ्रायर बॉक्समध्ये पॅक केला गेला त्याचवेळी हा सरडा या बॉक्समध्ये ठेवण्यात आला. आता ॲमेझॉन याची जबाबदारी घेत नाही आहे आणि सध्याची परिस्थिती खूप गंभीर आहे.” पुढे त्या प्राण्याबद्दल काळजी व्यक्त करत ती म्हणाली की, एवढ्या घट्ट पॅक केलेल्या या बॉक्समध्ये त्या सरड्याचा जीवही जाऊ शकला असता.

ॲमेझॉनची प्रतिक्रिया (Amazon reply on Lizard Found Inside Parcel)

सोफिया सेरानोची पोस्ट व्हायरल होताच ॲमेझॉनने तिच्या ट्वीटवर रिप्लाय दिला. ॲमेझॉनने रिप्लाय देत एक लिंक शेअर केली आणि त्यावर तिची संपूर्ण समस्या सांगण्याची विनंती केली. तथापि, त्यानंतर सोफियाने नमूद केलं की, त्यांनी दिलेल्या उत्तरावर ती समाधानी नव्हती. कारण- त्यांनी सोफियाला एअर फ्रायर परत करण्यास सांगितला आणि त्याबदल्यात तिचे पैसे तिला परत करण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा… Viral Liquor Shop Poster: अरेच्चा! दारूच्या दुकानात शिकवलं जाणार इंग्रजी? ‘हे’ VIRAL पोस्टर पाहून चक्रावून जाल

Story img Loader