Sister dance in brother wedding: भावाचं लग्न म्हणजे बहिणासाठी मोठा आनंदाचा क्षण असतो. अशावेळी तिच्या आनंदाला पारावर उरलेला नसतो. सर्वांना निमंत्रण देण्यापासून भावाची तयारी करण्यापासून सर्वच काम तिला करायची असते. लग्नात भावासाठी सरप्राईज देण्याचा ट्रेण्डही सध्या वाढतोय. अशाच एका बहिणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोयं. लग्न हे आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. इथं दोन मनं जुळण्यासोबत दोन परिवारही एकत्र येत असतात. आपल्या देशात अनेक अशा परंपरा आहेत ज्या लग्न समारंभात जपल्या जातात. नृत्य हा त्यातलाच एक प्रकार म्हणावा लागेल. आनंद द्विगुणित करण्यासाठी घरगुती समारंभातही नृत्य पाहायला मिळतं. अशाच आठवणी सुंदर करण्यासाठी एका बहिणीने भावाच्या लग्नात मन भरून नृत्य केलंय जे सध्या लाखोंच्या पसंतीस पडलंय.

लग्न असलं की घरातील वातावरण वेगळंच असतं. त्यातही भावाचे लग्न असल्यास त्याचा आनंद काही औरच असतो. आपल्या भावाच्या लग्नाची सर्वात जास्त आनंद बहिणीलाच असतो. सध्या अशाच एका नवरदेवाच्या बहिणीला झालेला आनंद पाहून नेटकरी भारावून गेले आहेत. या व्हिडिओमध्ये नवरदेवाची बहीण भर मंडपात दिलखुलासपणे डान्स करत आहे. नवरदेवाच्या बहिणीचा डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

तुम्ही व्हिडिओमध्ये पाहु शकता की नवऱ्याच्या बहिणीने डान्स करताना नऊवारी साडी नेसली असून भन्नाट डान्स केला आहे. “लो चली मै अपनी भाई की बारात लेके लो चली मैं” या गाण्यावर वरीनं डान्स करत भावाला आणि वहिनीला चांगलंच सरप्राईज दिलंय. यावेळी डान्स करतानाचे तिचे हावभाव आणि तिला झालेला आनंद पाहण्यासारखा आहे. लग्नसमारंभातील वऱ्हाडी मंडळी तसेच इतर पाहुणे नवरदेवाच्या बहिणीचा डान्स पाहत आहेत. टाळ्या वाजवून ते तिचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा व्हिडिओ कुठे शूट झालाय ? ती मुलगी कोण ? याबद्दल माहिती समोर आली नाहीयं.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर नवरदेवाच्या बहिणीचा डान्स चांगलाच व्हायरल झाला आहे. हा डान्स पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तसेच या मजेदार व्हिडीओला शेअरसुद्धा करत आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला renukamakeupartist या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट करण्यात आले आहे.