मार्चच्या अखेरीस लागू झालेल्या नवीन नियमानुसार, उबर ॲपवर प्रदर्शित होणारे भाडे केवळ अंदाजे भाडे सूचवणारा आकडा असेल आणि प्रवाशांना प्रत्यक्षात किती रक्कम द्यावी लागेल हे मीटर रीडिंगवर आधारित असेल. उबरच्या ऑटो रिक्षांसाठीच्या भाडे धोरणातील नवीन नियमामुळे पुणेकर निराश झाले आहेत कारण त्यांना आता अंतिम भाड्याबाबत अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे.

पुण्यात उबर ऑटोच्या भाड्यांवरून सुरू असलेल्या गोंधळात, एका स्थानिक ऑटो रिक्षा चालक आणि उबर रिक्षाचालक यांच्यात वाद वाढला आहे. पुण्यात ॲप-आधारित वाहतूक सेवा सुरू करण्यास विरोध करणाऱ्या एका रिक्षाचालकाने एका उबर ऑटो चालकाला आणि महिला प्रवासीला त्रास दिल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. पुण्यातील हडपसर येथून ही घटना समोर आली आहे.

व्हिडिओमध्ये, एक महिला उबर ऑटो बुक करते आणि तिच्या मुलीला शाळेतून आणण्यासाठी जाते. पण, ऑटोरिक्षाचालक तिच्या सोसायटीच्या लॉबीमध्ये पोहोचताच, एक स्थानिक ऑटो रिक्षा चालक अचानक येतो आणि रिक्षाचालकाचा रस्ता अडवतो. व्हायरल क्लिपमध्ये, स्थानिक ऑटो रिक्षा चालक महिलेला उबर राईड रद्द करण्यास सांगतो. “उबरने जायचे नाही, राईड कॅन्सल करा.” महिला त्याला वारंवार विचारते, “तुम्ही हे का सांगत आहात, त्यावर तो काहीच उत्तर देत नाही. उबरचालकाला राईड कॅन्सल कर धमकावतो.” महिला त्या रिक्षाचालकाला नकार देते आणि उबर रिक्षाचालकाला तेथून जाण्यास सांगते. जेव्हा महिला प्रवासी आणि रिक्षाचालक तेथून जात असतात तेव्हा त्या पुरूषाच्या ऑटोरिक्षा नंबर नोट करते.

व्हिडिओ पहा:

पुण्यात ही पहिलीच घटना नाही. शहरातील अनेक भागात स्थानिक ऑटो चालक उबर, ओला कॅब आणि ऑटोंना धमक्या देतात. संगमवाडी येथून अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, जिथे भारत आणि महाराष्ट्राच्या काही भागांतून आलेल्या खाजगी बस प्रवाशांना उतरवतात आणि रिक्षाचालक त्यांना सोडतात.

व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांचा संताप

व्हायरल व्हिडिओ पाहून अनेकांना रोष व्यक्त केला आहे. एकाने कमेंट केली की, “रिक्षाचालक आणि गुंडगिरी हे अतुट नाते आहे”

दुसऱ्याने कमेंट केली की, काल मी ऑफिसला जाण्यासाठी उबर बुक केली, पण जेव्हा ती आली तेव्हा ड्रायव्हर म्हणाला, “तुम्ही बुकिंग रद्द करा, आम्ही मीटरने जाऊ.” मी नकार दिला, मग तो म्हणाला, “ठीक आहे, ते रद्द करा, कारण गेल्या दोन दिवसांपासून सर्व ऑटो चालकांनी उबर ॲप वापरण्याऐवजी मीटरने जाण्याचा निर्णय घेतला आहे”.

तिसऱ्याने कमेंट केली की, “माझ्याबरोबर असेच घडले, ऑटोवाला १४० मागत होता तेव्हा रॅपिडोने १०० दाखवले, मी १२० पेक्षा जास्त पैसे देणार नाही असे सांगितले, तो म्हणाला रद्द करा. मी रद्द केले आणि १५० मध्ये कॅब बुक केली.”

मीटरसह छेडछाड

सध्या पुण्यातील प्रवाशांना उबर आणि ऑटो चालकांच्या नवीन करारामुळे अडचणी येत आहेत. पुणे येथील ऑटो चालकांनी उबरबरोबर केलेल्या नवीन कराराशी सहमती दर्शविण्याचा प्रयत्न करत असताना, पुणेकर आता मीटर छेडछाडीबद्दल चिंता व्यक्त करत आहेत.

उबरसारख्या अ‍ॅग्रीगेटर अ‍ॅप्सद्वारे राईड्स बुक करूनही, ऑटो रिक्षा चालकांकडून कथित भाडे मीटर छेडछाडीमुळे जास्त पैसे आकारले जात असल्याचे पुण्यातील अनेक प्रवाशांनी नोंदवले आहे.