Local Train Shocking Video : मुंबई लोकल प्रवाशांच्या अपघाताच्या घटना वारंवार समोर येतात. कामाच्या वेळात वाढत्या गर्दीमुळे अनेक प्रवाशांना लोकल ट्रेनच्या दरवाजावर लटकून प्रवास करावा लागतो. अशा वेळी काही प्रवासी अपघाताचे बळी ठरतात; तर दुसरीकडे काही प्रवासी स्वत:च्या चुकांमुळे आपला जीव गमावतात. मग स्टंटबाजी करणं असो वा इतर काही कारणं असो. वारंवार अशा घटना घडत असतानाही लोक यातून काही धडा घेताना दिसत नाहीत. सध्या सोशल मीडियावर लोकल ट्रेनमधील असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात धावत्या लोकलच्या दरवाजावर उभ्या असलेल्या प्रवाशाबरोबर एक भयंकर घटना घडते, जी पाहून लोक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही लोकल ट्रेनमधून प्रवास करताना, ‘ट्रेनच्या दरवाजाबाहेर लटकून प्रवास करू नका,’ अशी उदघोषणा होत असल्याचे ऐकले असेल. ती उदघोषणा प्रवासी ऐकतात; पण तिचे पालन करत नाहीत. अशा प्रकारे एक प्रवासी ट्रेनच्या दरवाजाबाहेर लटकून प्रवास करत होता. त्यावेळी त्याला अचानक एका भयानक घटनेचा सामना करावा लागला.

लोकल ट्रेनच्या दरवाजावर उभे राहणे कसे अंगलट येऊ शकते एकदा पाहाच

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक प्रवासी धावत्या लोकल ट्रेनच्या दरवाजात उभा राहून प्रवास करत होता. यावेळी ज्या प्लॅटफॉर्मवरून ट्रेन जात होती त्या प्लॅटफॉर्मवरील एक व्यक्ती दरवाजावर उभ्या असलेल्या प्रवाशाच्या जोरात कानाखाली मारतो. काही वेळ त्या प्रवाशालाही समजले नाही काय घडले; पण यातून दरवाजा उभे राहणे कसे अंगलट येऊ शकते हे त्या व्यक्तीला चांगलेच समजले असणार. ही घटना मजेशीर वाटत असली तरी अशा प्रकारे कोणावर हात उचलणे चुकीचे आहे.

पण, व्हायरल होत असलेला व्हिडीओ कोणत्या रेल्वे स्टेशनवरील आहे ते अद्याप समजू शकलेले नाही. पण, हा व्हिडीओ पाहून काहींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे, तर काहींनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. @Pratahkal.live नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर एक युजरने लिहिले की, मस्त काम केलेस भावा. दुसऱ्या युजरने लिहिले की, आता दरवाजात उभा राहून प्रवास करताना हजार वेळा विचार कराल. अशा प्रकारे लोकांनी कानाखाली मारणाऱ्या व्यक्तीचे कौतुक केले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Local train shocking video passenger standing at the door of train was hit in the ear by a person on the platform sjr