भूतदया म्हणजे पशु पक्षांविषयी असलेली सहानभूती किंवा प्रेम. प्रत्येक व्यक्तीमध्ये जसी माणसुकी असली पाहिजे असे म्हटले जाते तसेच प्राणी आणि पशु पक्ष्यांसाठी प्रेम किंवा सहानभुती असली पाहिजे अशी शिकवण आपल्यापैकी सर्वांना शाळेत दिली जाते. आज काल माणसांमधील माणुसकी जशी संपत चालली आहे तशीच भुतदया देखील नाहीशी होत आहे. याची प्रचिती देणारे अनेक व्हिडिओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी कोणी कुत्र्याला अमानुषपणे मारताना दिसते तर कोणी सापाला. पण फार मोजक्या अशा घटना असतात ज्या पाहिल्यानंतर माणुसकी आणि भुतदया अजूनही जिवंत आहे यावर विश्वास बसतो. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशलमीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये प्राण्यांचे व्हिडिओ देखील खूप चर्चेत असतात विशेषत: सापाचे. मानवी वस्ती असलेल्या परिसरात अनेकदा सापाचा शिरकाव होतो अशावेळी सर्पमित्रांच्या मदतीने सापाला पकडून पुन्हा सुरक्षितपणे जंगलात सोडले जाते. अशाच एका सर्पमित्राला एक बेशुद्ध अवस्थेतील साप आढळला. सापला वाचवण्यासाठी तरुणाने जे काही केलं ते पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.

Father and son imprisonment, imprisonment beat police,
मुंबई : कर्तव्या बजावणाऱ्या पोलिसांना मारहाण करणे महागात, पिता-पुत्राला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा
19th October 2024 Rashibhavishya In Marathi
१९ ऑक्टोबर पंचांग: भरणी नक्षत्रात बहरणार प्रेमाची नाती,…
Malad Road rage mns activist Akash Maeen death
Malad Road Rage: ‘आमच्या डोळ्यादेखत त्याला जीवे मारलं’, मनसे कार्यकर्ता आकाश माईनच्या आईनं व्यक्त केला आक्रोश
Rajasthan elderly couple suicide
उपाशी ठेवून भीक मागायला सांगितलं, पोटच्या मुलांकडून संपत्तीसाठी आई-वडिलांचा छळ; वृद्ध दाम्पत्यानं जीवन संपवलं
fruit vendor in Bhandara assaulted minor boy in his godown few days ago
संतापजनक ! अल्पवयीन मुलासोबत गोडाऊनमध्ये केले अनैसर्गिक कृत्य ; अखेर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
mira road police suicide
मीरा रोड मध्ये पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या
Rahul Gandhi Kolhapur
“वांग्याची, हरभऱ्याची भाजी बनवली, भाकऱ्या थापल्या”, राहुल गांधीनी कोल्हापुरात टेम्पोचालकाच्या घरात बनवला स्वयंपाक!
UP Crime Scene
UP Crime : पत्नीच्या लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधामुळे आख्खं कुटुंब उद्ध्वस्त! प्रियकराने एकाचवेळी केली चौघांची हत्या; चिमुरड्या मुलींवरही घातल्या गोळ्या

व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण बेशुद्ध सापाला सावधपणे मुठीत पकडतो आणि मुठीत त्याचे तोंड पकतो आणि तोंडाद्वारे हवा सोडतो. बेशुद्ध सापाला हा तरुण तीनदा सीपीआरचा प्रयत्न देतो. पहिले दोन प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर तिसऱ्यांदा तोडी हालचाल करू लागतो आणि शुद्धीत येतो. तरुणाने सापाला जीवदान दिले आहे. हा नाट्यमय बचाव व्हिडीओमध्ये कैद करण्यात आला आणि X वरील ‘माय वडोदरा’ अकाऊंटद्वारे शेअर केला गेला. या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी व्हिडीओवर कमेंट करून तरुणांचे कौतुक करत आहेत.

हेही वाचा –व्वा रे पठ्या! “अशी मी मदन मंजिरी” गाण्यावर तरुणांचे भन्नाट नृत्य, थेट फुलवंतीला दिली टक्कर, पाहा Viral Video

सीपीआर देऊन प्राण्यांना वाचवल्याची ही पहिलीच वेळ नव्हती. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये, मे २०२४ मध्ये, विकास तोमर, हेड कॉन्स्टेबल, एका माकडाला वाचवले जे फांदीवरून बहुधा अति उष्णतेमुळे खालीकोसळले होते आणि बेशुद्ध झाले होते.माकडाला शुद्ध नसताना तोमर त्याच्या सहकारी पोलिसांच्या मदतीने बेशुद्ध प्राण्याला CPR देऊन त्याचा जीव वाचावला होता.

हेही वाचा –स्त्री २च्या “काटी रात मैने..” गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स, Viral Video पाहून श्रद्धा कपूरनेही केले कौतुक

गेल्या महिन्यात उटाहमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांनी एका अपार्टमेंटमध्ये लागलेल्या आगीपासून बेशुद्ध कुत्र्याला वाचवले आणि सीपीआरचे प्रभावीपणे व्यवस्थापन करून प्राण्याला वाचवले.

हेही वाचा –‘सजना वे सजना’ गाण्यावर राधिका मर्चंटचा अफलातून डान्स, मैत्रिणीच्या लग्नातील Video Viral! अंबानीच्या छोट्या सुनबाईंच्या ड्रेसची सर्वत्र चर्चा

वडोदरा मधला साप असो किंवा उटाह मधला कुत्रा असो, करुणेला मर्यादा नसतात आणि प्रत्येक जीव वाचवता येईल इतका मौल्यवान असतो.