भारतामध्ये अनेक पर्यटक आवर्जून भेटीसाठी येतात. विविध राज्यांच्या विविध संस्कृती आणि खाद्यसस्कृंती, विविध पेहराव, विविध भाषा अनेक पर्यटकांना भारत पर्यटनाचे मुख्य आकर्षण ठरतात. पण अनेकदा पर्यटकांना लुबाटण्याचा प्रयत्न काही लोक करतात ज्यामुळे भारतीयांचे नाव खराब होते. कधी १०० रुपयाची वस्तू १००० रुपयांना विकतात तर कधी १०० रुपयाच्या प्रवास भाड्याऐवजी दुप्पट तिप्पट रक्कम आकारतात. अशा अनुभवांमुळे अनेक पर्यटक नाराज होतात आणि त्यांना आलेल्या अशा अनुभवांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या अशा एका व्हिडीओ सोशल मिडियावर जोरदार चर्चा
सुरू आहे.
एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये दिल्लीत एक परदेशी पर्यटक आणि रिक्षाचालक यांच्यात जोरदार वाद सुरु असल्याचे दिसते. इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणावर शेअर केलेल्या या व्हिडिओला १.६ दशलक्ष पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओमध्ये पर्यटक स्वत: फोटो काढताना, दोघांमधील तणावपूर्ण वादाचा व्हिडिओ शुट करत आहे.
u
ही घटना, दिल्लीच्या चांदणी चौक भागात घडली आहे असे मानले जाते, पर्यटक भाड्यावर चालकाबरोबर वाद घालत आहे. फुटेजमध्ये पर्यटक दिसत नसला तरी, संपूर्ण व्हिडिओमध्ये त्याचा आवाज ऐकू येतो, जो त्याने स्वतः रेकॉर्ड केला आहे.
व्हिडिओमध्ये रिक्षाचालक १५०० रुपयांची मागणी करतो, तर पर्यटक ५०० रुपयांची नोट देतो. तरीही चालत वारंवार आणखी पैसे मागतो.
व्हिडिओ पहा:
वाद सुरु असताना स्थानिक लोक मदतीला धावून येतात आणि पर्यटकाची चौकशी करू लागतात. तेव्हा असे उघड झाले की, ५०० रुपये भाड्याचे नव्हते, तर पर्यटकांनी दिलेली भेट होती. तेथे उभे असलेले लोक रिक्षाचालकाला पैसे परत करण्यास सांगतात, परंतु चालक नकार देतो आणि व्हिडिओ संपतो.
@samesamevic या इंस्टाग्राम हँडलने हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात कॅप्शन आहे, “भारतात पहिल्या दिवशी गोंधळ झाला – पण स्थानिकांनी मला वाचवले!”
व्हिडिओला ऑनलाइन विविध प्रतिक्रिया मिळाल्या, एका वापरकर्त्याने कमेंट केली, “काही सुशिक्षित लोक समोर आले आहेत हे पाहणे चांगले आहे.” दुसऱ्याने सुचवले, “तुम्हाला भारतात काही त्रास होत असल्यास स्थानिकांशी संपर्क साधा, ते तुम्हाला नक्कीच मदत करतील.”
तिसऱ्याने सांगितले “फक्त भारतातच नाही तर पर्यटकांसह प्रत्येक देशात घडते परंतु स्थानिकांनी हस्तक्षेप केला आणि मदत केली याचा खूप आनंद झाला.”
आणखी एकाने लिहिले, पॉपकॉर्नसह चित्रपट पाहत असल्यासारखा एक व्यक्ती तिथे खात उभा आहे.
‘या लोकांमुळे भारतीयांचे नाव खराब होते’ असे मत ही एकाने व्यक्त केले तर दुसरा म्हणाला,”भाऊ तू चुकीच्या व्यक्तीला भेटला”