Train Running In Foggy Condition : थंडी आणि धुक्यामुळे देशभरात वाहनांचा वेग मंदावला आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह देशातील बहुतांश भागात थंडीची लाट पसरली आहे. दाट धुक्यामुळे रस्त्यांवर शांतता आहे. सकाळच्या वेळी मोजकीच वाहने संथगतीने जाताना दिसतात. थंडीचा परिणाम ट्रेनवरही झाल्याचे दिसून येत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये अनेकदा ट्रेन उशीर सोडल्या जात असल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. खरं तर, हिवाळ्यात धुक्यामुळे ट्रेनला उशीर होतो. दाट धुक्यात ट्रेन चालवणे किती आव्हानात्मक आहे याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. धुक्यामुळे अनेक वेळा लोको पायलट किंवा ट्रेन चालकांना ट्रॅकही दिसत नाही आणि अशा परिस्थितीतही ते जीव धोक्यात घालून प्रवास करताना दिसतात. नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक ट्रेन दाट धुक्यातून जाताना दिसत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा