Viral Video : सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाळ्यात अनेक जण वीकेंडला फिरण्यासाठी घराबाहेर पडतात. निसर्ग न्याहाळण्यासाठी ट्रिपवर जातात. झरे, धबधबे, तलाव नदीवर जातात आणि मनसोक्त पावसाचा आनंद लुटतात. तुम्हीही वीकेंडला फिरायला जायचा विचार करत आहात का? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुणे आणि मुंबई जवळच्या एका सुंदर ठिकाणाविषयी सांगितले आहे. तुम्ही या ठिकाणाला अवश्य भेट देऊ शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे अन् मुंबईपासून जवळ असलेले हे निसर्गरम्य व सुंदर ठिकाण पाहिले का?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक निसर्गरम्य ठिकाण दिसेल. हे ठिकाण लोहगड आहे. लोहगडावरील नयनरम्य दृश्य तुम्हाला दिसेल. व्हिडीओत लोहगड किल्ला, हिरवा निसर्ग, धुके आणि सुंदर दृश्ये दाखवलेली आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडीओवर लिहिलेय, “पावसाळ्यात लोहगड”
लोहगड हा पुण्यापासून ५२ किमी आणि ९८ किमी अंतरावर आहे. हा एक डोंगरी किल्ला आहे. हा पश्चिम घाटाचा एक भाग आहे. हा इतर सर्व किल्ल्यांपेक्षा अतिशय मजबूत आणि बुलंद आहे. हिरवाई नटलेल्या हा किल्ला बघायला पर्यटक दरवर्षी गर्दी करतात. पुणे आणि मुंबई पासून जवळ असलेले हे ठिकाण एका दिवसीय ट्रिपसाठी उत्तम पर्याय आहे.

हेही वाचा : Video : शिक्षणाची सुरवात मातृभाषा मराठीतूनच व्हायला हवी! चिमुकलीने गायली सुंदर कविता,”म्याँव म्याँव म्याँव…येऊ का घरात?”

पाहा व्हायरल व्हिडीओ

stories.with.shivani या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “लोणावळ्याजवळील लोहगड किल्ला मुंबई आणि पुण्यापासून एक दिवसाच्या ट्रिपसाठी उत्तम ठिकाण आहे”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “काय सुंदर दृश्य आहे” तर काही युजरने व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

हेही वाचा : सौदी अरेबियात एक लाख रुपयांना विकली जाते ‘ही’ स्लीपर; Video पाहून लोक म्हणाले, “अरे भारतात ही तर टॉयलेटला…”

पावसाळ्यात पुणे मुंबईजवळच्या अनेक ठिकाणचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. पुण्यापासून फक्त ३० किमी अंतरावर असलेल्या कुंडमळा धबधब्याविषयी या व्हिडीओमध्ये माहिती सांगितली होती. पुण्यातील मावळ तालुक्यात असलेले कुंडमळा धबधबा दरवर्षी पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असते. बेगडेवाडी रेल्वे स्टेशनच्या जवळील कुंडमळा हे एक छोटे गाव आहे. दरवर्षी पावसाळ्यात येथील धबधबा पाहण्यास सर्व उत्सुक असतात.