सौजन्य- विश्वास न्यूज
अनुवाद – अंकिता देशकर
Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकाला १९ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात २१ राज्यात एकूण १०२ जागांसाठी मतदान पार पडले. यात अरुणाचल आणि सिक्कीमच्या ९२ विधानसभा मतदारसंघांसाठीही मतदान झाले. या निवडणुकीत जवळपास ६४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याचदरम्यान सोशल मीडियावर ईव्हीएमशी जोडलेल्या VVPAT मशीनसंदर्भात एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. यात काही लोक VVPAT मशीनमधून स्लिप बाहेर काढताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत काहींनी हा प्रकार १९ एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानानंतरचा असून यात भाजपने VVPAT मशीनमधील स्लिपमध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. यानंतर विश्वास न्यूजने व्हायरल व्हिडीओमागची सत्यता तपासण्याचा प्रयत्न केला. ज्यातून काय सत्य समोर आले जाणून घेऊ…
काय होत आहे व्हायरल?
सोशल मीडिया यूजर ‘Adak Sukesh’ ने व्हायरल व्हिडिओ शेअर करत लिहले, “बहुत अहम वीडियो है आप इसको जरूर देखिए 19 तारीख में जो चुनाव हुआ चुनाव के बाद ईवीएम जहां फुल सिक्योरिटी में रखी जाती है वहां ईवीएम से वीवीपीएटी से पर्ची चुराई जा रही है और भारतीय जनता पार्टी अपनी पर्ची डलवा रही है।”
वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही इतर अनेक युजर्सनी हा व्हिडिओ ह्या दाव्यांसह शेअर केला आहे.
तपास:
या दाव्यासह हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही वेगवेगळ्या निवडणुकांदरम्यान अशाच संदर्भात हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. गेल्या वेळी, कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी, हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता आणि दावा केला होता की, हा ईव्हीएम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनशी छेडछाड करतानाचा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये व्हीव्हीपीएटी मशीनमधून काढून टाकली जात आहे आणि ती नष्ट केली जात आहे, पण नियमानुसार, ती एका वर्षापर्यंत सुरक्षित ठेवावी लागते.
खरेतर, हा व्हिडिओ निवडणूक आयोगाच्या प्रस्थापित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, EVM मधून VVPAT मशीन काढल्याचा होता, त्या नष्ट किंवा लपवून ठेवल्याचा नाही. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, VVPAT स्लिप मशीनमधून बाहेर काढल्या जातात, काळ्या लिफाफ्यात सुरक्षितपणे ठेवल्या जातात आणि सीलबंद केल्या जातात, जेणेकरून VVPAT पुढील निवडणुकीत वापरता येईल. व्हायरल व्हिडिओमध्ये, संपूर्ण प्रक्रिया कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली जात आहे आणि VVPAT स्लिप्स काळ्या लिफाफ्यात ठेवल्या जात असल्याचे दिसत आहे.
13 डिसेंबर 2022 रोजी हा व्हिडिओ ट्विट करत एका एक्स यूजरने संगितिले की, आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मतमोजणी झाल्यानंतर, ईव्हीएम मशीनला जोडलेल्या VVPAT मशीनमधून स्लिप्स काढल्या जातात आणि काळ्या लिफाफ्यात ठेवल्या जातात आणि सीलबंद केल्या जातात, जेणेकरून VVPAT पुढच्या निवडणुकात वापरता येईल. या संपूर्ण प्रक्रियेची व्हिडीओग्राफी केली जाते आणि त्याची एक प्रत स्ट्राँग रूममध्ये ठेवली जाते, तर दुसरी संबंधित डीईओकडे ठेवली जाते.
यापूर्वी, विश्वास न्यूजने निवडणूक आयोगाच्या तत्कालीन प्रवक्त्या शेफाली शरण यांच्याशी संपर्क साधला होता त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, व्हायरल व्हिडिओ जुन्या घटनेशी संबंधित आहे आणि त्यात जे काही दिसत आहे ते ECI च्या स्थापित मानकांनुसार आहे.
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, लोकसभा निवडणूक २०२४ एकूण सात टप्प्यांत होणार असून, १९ एप्रिलपासून पहिल्या टप्प्यात एकूण १०२ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. पुढील टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी होणार असून त्याअंतर्गत एकूण ८९ जागांसाठी मतदान होणार आहे.
निष्कर्ष:
विश्वास न्यूजच्या तपासणीत हा व्हायरल व्हिडीओतील दावा खोटा असल्याचे समोर आले आहे. नियमानुसार, लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर VVPAT मशिनमधून स्लिप्स काढण्याच्या प्रक्रियेचा व्हिडिओ बनावट दाव्यांसह व्हायरल केला जात आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पुढील निवडणुकीपूर्वी मशीन्स तयार करण्यासाठी, VVPAT स्लिप्स बाहेर काढल्या जातात आणि एका लिफाफ्यात ठेवल्या जातात आणि सीलबंद केल्या जातात. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्येही हे स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. मात्र, पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर स्लिप्स चोरल्या जात असल्याचा दावा करत हा व्हिडिओ शेअर केला जात आहे, जेणेकरून लोकसभा निवडणुकीच्या निकालावर परिणाम होऊ शकेल, अश्या खोट्या दाव्यांसह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(ही कथा विश्वास न्यूजने प्रकाशित केली होती आणि शक्ती कलेक्टिव्हचा एक भाग म्हणून लोकसत्ता पुनर्प्रकाशित केली आहे.)