Lok Sabha Election Exit Poll Results Viral Memes : लोकसभा निवडणुकीचे सात टप्प्यांतील मतदान संपल्यानंतर आता एक्झिट पोलवरील आकडेवारी समोर येत आहे. त्यातून कोणत्या मतदारसंघात कोणाला बहुमत सिद्ध होईल याचे अंदाज बांधले जात आहेत. पण बहुतांश एक्झिट पोलमध्ये एनडीएला बहुमत मिळताना दिसत आहे. काही एक्झिट पोलमध्ये एनडीए ४०० किंवा त्याहून अधिकचा आकडा पार करेल, असा अंदाज वर्तविण्यात आला. एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली आहे. इतकेच नाही, तर एक्झिट पोलच्या आकडेवारीवरून सोशल मीडियावर मीम्सचा महापूर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एनडीएला बहुमत मिळण्याचा अंदाज

अनेक एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार,भाजपाला ४०० जागा मिळतील असा अंदाज आहे, यात एनडीएला ४०० (± १५) जागा आणि इंडियाला १०७ (± ११) जागा मिळतील, असा अंदाज आहे.

इतकेच नव्हे, तर भाजपा अनेक राज्यांमध्ये क्लीन स्वीप करू शकते; ज्यामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड व गुजरातच्या सर्व जागा भाजपा जिंकू शकते. उत्तर प्रदेशमध्ये एनडीएला ६८, तर इंडियाला १२ जागा मिळण्याची अपेक्षा आहे.

एक्झिट पोलवरून सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल

एनडीएने ४०० जागांचा नारा दिला होता. यात पंतप्रधान मोदींनी यावेळी ४०० च्या पुढे ही घोषणा अनेक वेळा दिली होती. परंतु, विरोधकांचा एक्झिट पोलवर विश्वास नाही. त्यामुळे ते असे म्हणताना दिसतायत की, ४ जूनला जेव्हा निकाल जाहीर होतील तेव्हा हे सर्व एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील आणि इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होईल.

एक्झिट पोलच्या आकडेवारीत बहुमत मिळाल्यानंतर भाजप नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. आता ते नरेंद्र मोदींचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन करीत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha election 2024 exit poll result nda majority netizens share viral funny memes rajasthan maharashtra uttarpradesh gujarat telangana kerala manipur jammu kashmir election result live sjr