Pradeep Gupta Of Axis My India Exit Poll Fame Breaks Down On LIVE TV : लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालाची अधिकृत आकडेवारी आज जाहीर होत आहे, पण जाहीर होणारी आकडेवारी पाहता लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोल पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसत आहे. या निवडणुकीत एक्झिट पोलचे आकडे फोल ठरले आहेत. जवळपास सर्वच एक्झिट पोलने भाजपाला ३५० पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. मात्र, प्रत्यक्षात जाहीर झालेल्या निकालात भाजपा स्वबळावर बहुमत मिळवू शकेल असेही वाटत नाही. या एक्झिट पोलिंग एजन्सीत ॲक्सिस माय इंडियाचे एमडी प्रदीप गुप्ता यांनी भाजपा ४०० हून अधिक जागा जिंकेल असा अंदाज वर्तवला होता, मात्र फोल ठरलेले अंदाज पाहता ॲक्सिस माय इंडियाचे एमडी प्रदीप गुप्ता यांनी एका लाईव्ह टीव्ही शोमध्ये अक्षरश: हंबरडा फोडला.
एक्झिट पोलमध्ये कुठे चूक झाली हे प्रदीप गुप्ता लाईव्ह शोमध्ये सांगत होते. यावेळी चुकीच्या अंदाजावर त्यांनी जाहीर माफी मागितली, पण यावेळी त्यांना अश्रू आवरणे अवघड झाले.
ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीवरून सोशल मीडियावरही प्रदीप गुप्ता यांच्यावर जोरदार टीका झाली. निकालाच्या एक दिवस आधी प्रदीप यांनी ६९ पैकी ६५ एक्झिट पोल बरोबर असल्याचे सांगितले होते. इतकेच नाही, तर एक्झिट पोलला मोदी मीडिया पोल आणि फँटसी पोल म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचाही त्यांनी समाचार घेतला आहे.
प्रदीप गुप्ता म्हणाले होते की, ‘राहुल गांधी किंवा काँग्रेसने भारत आघाडीसाठी निवडणूक लढवली आहे. तामिळनाडू, महाराष्ट्र, बिहार, झारखंड अशा विविध भागांत प्रादेशिक पक्षांनी निवडणुका लढवल्या आहेत. राहुल गांधी हे ब्रँड दिसत नाहीत, जिथे काँग्रेसची सत्ता आहे; कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे मतदार राहुल गांधींच्या नावाने मतदान करत नाहीत, तर तिथल्या काँग्रेस सरकारने दिलेल्या सुविधा आणि व्यवस्थेच्या आधारे मतदान करतात.
Axis My India च्या सर्वेक्षणात काय होते?
‘ॲक्सिस माय इंडिया’च्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला ३६१-४०१ जागा मिळतील असे म्हटले होते. गुप्ता यांच्या एक्झिट पोलमध्ये ‘इंडिया’ आघाडीला १३१-१६६ जागांवर समाधान मानावे लागेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, निवडणुकीचे अधिकृत निकाल आले तेव्हा चित्र पूर्णपणे उलट होते. भाजपा स्वबळावर बहुमताच्या आकड्यापासून दूर असल्याचे दिसत आहे, जे पाहून गुप्ता यांना रडू आले. मात्र, टीव्हीवर भावूक होण्याची त्यांची ही पहिलीच वेळ नाही. २०१९ मध्येही एक्झिट पोलमध्ये अचूक अंदाज बांधणारे गुप्ता रडू लागले होते.