lok sabha election results 2024: आज देशासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असून, देशात पार पडलेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज ४ जून रोजी जाहीर होणार आहे. संपूर्ण देशाचे या निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे. संपूर्ण देशात एनडीए आणि इंडियामध्ये चुरशीची लढत बघायला मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर छत्तीसगड येथील रायपूरमध्ये एका भाजपा नेत्याने एक्झिट पोलच्या निकालावर खूश होऊन २०१ किलोचे लाडू ऑर्डर केले आहेत; ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपाचा विजय होईल, असा अंदाज एक्झिट पोलनुसार वर्तविण्यात आला होता. या निकालावर खूश होऊन, तसेच या निवडणुकीत भाजपाच जिंकेल, असा अंदाज करून भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष ललित जयसिंग यांनी हे २०१ किलोचे लाडू मागविले आहेत.

Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
dhananjay munde valmik karad
Dhananjay Munde: “हे घ्या धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यातील संबंधाचे धडधडीत पुरावे”, अंजली दमानियांनी सातबारेच केले शेअर!
महाराष्ट्रातील तो फॉर्म्युला बिहारमध्येही चालणार? भाजपा नितीश कुमार यांना का सांभाळून ठेवतंय? (फोटो सौजन्य पीटीआय )
महाराष्ट्रात जे घडलंय, ते बिहारमध्येही घडणार? भाजपासाठी नितीश कुमार इतके महत्वाचे का?
Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Amol Mitkari : छगन भुजबळांनी घेतली फडणवीसांची भेट, राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “ही राजकीय भेट…”
Loksatta lalkilla BJP Congress video viral Rahul Gandhi Amit Shah
लालकिल्ला : शहांची कोंडी आणि भाजप सैरावैरा!
Chhagan Bhujbal On Ajit Pawar
Chhagan Bhujbal : “मग मला निवडणूक लढायला सांगायचं नव्हतं ना?”, छगन भुजबळांचा थेट अजित पवारांना सवाल
Ajit Pawar On Chhagan Bhujbal
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”

ANI शी बोलताना भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष ललित जयसिंग म्हणाले, “आम्ही २०१ किलो लाडू वाटण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि त्यासाठी आम्ही ११ प्रकारचे लाडू मागविले आहेत. आम्ही दुपारपासून रात्री ११ वाजेपर्यंत लाडू वाटू. त्यामध्ये बेसन, नारळ, चॉकलेट, बुंदी यांसारखे अनेक प्रकारचे लाडू आहेत.” तसेच यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप ४०० हून अधिक जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

दरम्यान, मंगळवारी लोकसभेच्या निकालापूर्वी जयपूरमधील भाजपाचे मुख्यालय सजविण्यात आले होते. तसेच बेंगळुरूमधील भाजपा मुख्यालयावरही रोषणाई करण्यात आली होती. सध्या मतमोजणी सुरू असून, काही तासांत निकाल जाहीर होईल. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत छत्तीसगडमध्ये ११ पैकी नऊ जागा भाजपने जिंकल्या होत्या; तर काँग्रेसने दोन जागा जिंकल्या होत्या.

हेही वाचा: “आम्ही कधीच बेपत्ता झालो नव्हतो” सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना मीम्सच्या माध्यमातून निवडणूक आयोगानं सुनावलं

पाहा व्हिडीओ:

एक्झिट पोलनुसार सत्ताधारी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए ३५२ जागा जिंकू शकते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ३०३ जागा जिंकल्या होत्या. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येण्याच्या प्रयत्नात आहेत.

Story img Loader