सेलेब्रिटी हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांनी सोमवारी भाजपामध्ये प्रवेश केला. हबीब यांच्या भाजपाप्रवेशानंतर सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होत आहे. या मीम्समध्ये भाजपा नेत्यांच्या वेगवेगळ्या हेअरस्टाईल दिसत आहेत.

जावेद हबीब यांच्या नावाने देशभरात अनेक लक्झरी सलून आहेत. ते लोकांसाठीच्या आगळयावेगळ्या केशभूषेसाठी ओळखले जातात. त्यामुळे ते भाजपात समील झाल्यावर त्यांच्या या कौशल्याचा वापर लोकांनी अनेक मीम्स तयार करण्यासाठी केला आहे. या मीम्समधून आता भाजपा नेत्यांमध्ये काय बदल होणार हे दर्शविण्यात येत असून पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांसह अनेक नेत्यांच्या हेअर स्टाईल बदलल्याचे सोशल मीडियावर दिसून येत आहे.