Nitish kumar viral video: लोकसभा निवडणुकीचे सुरुवातीचे कल हाती येऊ लागले आहेत. यामधील सर्वात मोठी घडामोड घडत असून याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर मीम्स, वेगवेगळे व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. हे मीम्स पाहून आणि लोकांची क्रिएटिव्हीटी पाहून तुम्हीही पोट धरु हसाल. नितीश कुमार यांनी भाषणात केलेल्या एका उल्लेखामुळे खुद्द मोदींसह इतर मान्यवरांना आश्चर्याचा धक्काच बसला. नितीश कुमार यांचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

“आणि नरेंद्र मोदी पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजेत.”

Devendra Bhuyar and Ajit pawar
Ajit Pawar : मुलींबाबत देवेंद्र भुयारांनी केलेल्या वक्तव्यावरून अजित पवारांनी केली कानउघाडणी; म्हणाले…
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
CM Eknath Shinde
CM Eknath Shinde : “आरोपी गोळीबार करतो, मग पोलिसांनी त्यांची बंदूक फक्त प्रदर्शनाला ठेवायची का?”, मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल
engineer arrested for making hoax threat call over pm modi life
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोक्याचा दूरध्वनी आणि पोलिसांची धावपळ; ‘अभियंत्याने’…
Eknath Shinde defends cops on Badlapur Encounter
Akshay Shinde Encounter: “अक्षय शिंदे पळाला असता तर…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं बदलापूर चकमकीवर विरोधकांना प्रत्युत्तर
CM Eknath Shinde On Akshay Shinde Encounter
Akshay Shinde Encounter : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलीस चकमकीत ठार; मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
Jagan Mohan Reddy
नायडूंना खोटे बोलण्याची सवयच, जगन मोहन रेड्डी यांचे मोदींना पत्र; मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप
aap leader Atishi
विश्लेषण: पहिल्यांदाच आमदार, पाठोपाठ दिल्लीचे मुख्यमंत्रीपद; आतिशींच्या निवडीमागे ‘आप’चे कोणते समीकरण?

बिहारमधील पटना साहिब लोकसभा मतदारसंघातील दनियावन येथे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी निवडणूक प्रचार सभेला संबोधित केले. यावेळी नितीश कुमार यांची जीभ घसरली. ते म्हणाले की, “आम्हाला बिहारमधील सर्व ४० आणि देशभरातील ४०० हून अधिक जागा जिंकायच्या आहेत. आणि नरेंद्र मोदी पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजेत.” या कार्यकर्ते तसेच स्टेजवर असणाऱ्यांमध्ये एकच हशा पिकला.

लोकसभा निवडणुकीच्या निकालात सकाळपासून हाती येणाऱ्या कलांनुसार भाजपाला मोठा फटका बसला आहे. भाजपाला गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदा बहुमतापेक्षा कमी आकडा मिळाला आहे. यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी एनडीएच्या घडक पक्षांवर म्हणजेच जेडीयू आणि टीडीपीवर अवलंबून राहावं लागेल.भाजपला स्वबळावर बहुमत मिळालं नाही तर नितीश कुमार यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. तर दुसरीकडे एनडीच्या नेत्यांनी उद्या दिल्लीत बैठकीचं आयोजन केलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: साताऱ्यात पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग! उदयनराजेंना कोसळलं रडू; नेमकं काय घडलं जलमंदिर पॅलेसमध्ये?

या सगळ्यात नेमकं पारडं कुणाचं जड होतं आणि नीतीश कुमार एनडीएसोबत राहतात की आपलं मत बदलतात ते पुढच्या अजून काही तासांच चित्र स्पष्ट होईल, सध्या तरी नीतीश कुमार यांनी एनडीएसोबत राहणार असल्याची भूमिका घेतली आहे, असं असलं तरी राजकीय वर्तुळात मात्र कुजबुज कायम आहे.

हा व्हिडीओ @bindass_ladki नावाच्या एक्स अकाऊंट वरुन शेअर केला असून नेटकरी मात्र या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.