Loksabha election 2024: सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. देशात यंदा लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यांत होत आहे. यापैकी १९ एप्रिलला पहिला टप्पा आणि २६ एप्रिलला दुसरा टप्पा पार पडला आहे. तर काल ७ मेला लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान झालं. मतदानासाठी वय मर्यादा २१ वरून १८ वर्षावर आणली. मात्र सध्या समोर आलेल्या प्रकरणात ज्येष्ठांसह लहान मुलेही लोकसभा निवडणुकीत मतदान करतानाचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

लहान मुलांना हा अधिकार दिला कुणी?

congress pawan khera talk about uncertainty on modi government
मोदींकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने केव्हाही मध्यावधी निवडणुका शक्य; काँग्रेसचे पवन खेरा यांचे भाकित
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
mumbai This election polling stations increased and started in housing societies to avoid evening crowding
साडेसहाशे गृहनिर्माण संस्थांमध्ये होणार मतदान, मुंबईत प्रथमच मोठ्या स्तरावर प्रयोग, मतदान वाढण्याची अपेक्षा
belapur assembly constituency sandeep naik vs manda mhatre maharashtra vidhan sabha election
लक्षवेधी लढत: भाजपच्या आमदार पुत्राचेच पक्षाला आव्हान
Voting
मतदानासाठी वयाची अट कोणत्या साली आणि कोणत्या घटनादुरुस्तीने बदलली, हे तुम्हाला माहीत आहे का?
Laxman Dhoble is in the Pawar group and son abhijit dhoble in opposition role
मोहोळमध्ये ढोबळे पिता-पुत्राचे निराळे सूर!
thane district home voting
ठाणे जिल्ह्यात ९३३ नागरिक करणार गृह मतदान, आज पासून मतदानास सुरुवात
Vote Karega Kulaba campaign to increase voter turnout print politics news
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ‘व्होट करेगा कुलाबा’ मोहीम; सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, निवृत्त अधिकाऱ्यांचा पुढाकार

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये काही शाळकरी मुले इलेक्शनमध्ये भाग घेताना दिसत आहेत. या इलेक्शनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की, लहान मुलांना हा अधिकार दिला कुणी? तर चला नेमकं प्रकरण काय आहे, हे जाणून घेऊ.

हे कसं झालं शक्य?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ मॉक इलेक्शनचा आहे. मुलांना मतदानाचं महत्व कळण्यासाठी या शाळेने हा उपक्रम राबवला आहे. ज्यामध्ये काही शाळकरी मुले मतदान केंद्रावर मतदान अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसत आहेत. ही मुले निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगत आहेत. यामध्ये टेबल खुर्च्यांवर तीन मुले बसली असून, ते मतदान अधिकाऱ्यांच्या रूपात आहेत. मतदार म्हणून, शाळकरी मूल मतदान केंद्रावर येतात आणि संपूर्ण प्रक्रियेनंतर मतदान करतात.

असे व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात. पण यात खास गोष्ट अशी आहे की, ज्या शाळकरी मुलांचे मतदान करण्याइतके वयही नाही त्यांच्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. मतदानासाठी जनजागृती करण्याच्या शाळेच्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ‘तिला’ भेटायला आला अन् गेम झाला; समोर गर्लफ्रेंड अन् मागे बाबा, नेमकं काय घडलं? बघा VIDEO

हा व्हिडिओ अवनीश शरण नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. जे एक आयएएस अधिकारी आहेत. ज्याला आतापर्यंत सुमारे १ लाख ५६ हजार वेळा पाहण्यात आले आहे, तर व्हिडिओला सुमारे ७ हजार वेळा लाईक करण्यात आले आहे. यावर युजर्स कमेंट करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिले… मुलांना याविषयी माहिती द्या किंवा त्यांना कळू नका, पण कोणाला मत द्यायचे हे त्यांचं त्यांना ठरवूदेत. मतदानासाठी जनजागृती करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले…मतदान छान आहे, निवडणुकीत सक्रिय सहभाग घ्या.