Loksabha election 2024: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेली लोकसभा निवडणूक २०२४च्या सातही टप्प्यातील मतदान पार पडले असून आज लोकसभा निवडणुकीचा निकाला जाहीर होणार आहे.. सोशल मीडियावर फिरत असलेल्या विविध मीम्सचा उल्लेख करत निवडणूक आयोगाला ‘लापता जेटंलमॅन’ असे संबोधले गेले होते. दरम्यान यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सोशल मीडियावर सुरु असलेल्या ‘लापता जेंटलमैन वापस आ गए’ मीम्सवर उत्तर दिले आहे. आयोगानंही कालच्या पत्रकार परिषदेत मिश्किल शब्दात उत्तर दिलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आम्ही कधीच बेपत्ता झालो नव्हतो

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सर्वोच्च नेत्यांनी केलेल्या आदर्श आचारसंहितेचा उल्लंघन केल्यानंतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी निवडणुक आयोगावर निशाणा साधला होता. मतदार यादीतील त्रुटी, ईव्हीएमची प्रभावीता आणि मतदारांच्या मतदानाच्या आकड्यांमध्ये कथित फसवणूक यावर प्रश्न उपस्थित केले गेले. हे मीम्स ‘लापता लेडीज’ नावाच्या अलीकडच्या चित्रपटावर आधारित होते. दरम्यान मंगळवारी मतमोजणीच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेला संबोधित करताना, श्री कुमार यांनी याची दखल घेत, सोशल मीडियावर ‘लापता जेटंलमॅन’ परत आले आहेत अशा टॅग लाइनसह मीम्सचा उल्लेख केला.

“आम्ही लापता नाहीये आम्ही इथेच आहोत”

आम्ही कधीच बेपत्ता झालो नव्हतो, असे उत्तर राजीव कुमार यांनी विरोधकांना दिले आहे. देशात ६४ कोटींपेक्षा जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याचे सांगत आम्ही या निवडणुकीत जागतिक रेक़ॉर्ड बनविले असल्याचा दावा केला आहे. देशातील मतदारांची संख्या जगातील २७ देशांपेक्षा जास्त आहे, असेही ते म्हणाले. “आम्ही लापता नाहीये आम्ही इथेच आहोत” त्यामुळे संभाळून अशा शब्दात निवडणूक आयोगानं ताकीद दिली आहे. आम्ही आमच्या प्रेस नोट्सद्वारे तुमच्याशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला. आम्ही १०० च्या वर जवळपास प्रेस नोट्स आणि सल्ले एकत्रितपणे जारी करण्याची ही पहिलीच वेळ होती,” असंही ते म्हणाले.

हेही वाचा >> Lok Sabha Election Result 2024: मतमोजणीच्या दिवशी शेअर बाजारात अनपेक्षित घडामोडी; २५०० अंकांनी बाजार कोसळला!

मतदान कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणींचा देखील कुमार यांनी दाखला दिला आहे. मतदान कर्मचाऱ्यांना मतदानाला जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जेव्हा त्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते तेव्हा त्यांच्या अंतःकरणातून काय जात असेल याची कल्पना करा, असा सल्लाही निवडणूक आयुक्तांनी दिला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksabha election 2024 we were always here never went missing cec on memes calling election commissioners laapata gentlemen srk