Loksabha election 2024: लोकसभा निवडणुकीचे निकाल जसजसे समोर येत आहेत, तसतसे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मीम्सचा महापूर आला आहे. लोकसभा निवडणकीत यंदा लाखो लोकांनी मतदान केले. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेली लोकसभा निवडणूक २०२४च्या सातही टप्प्यातील मतदान पार पडले असून आज लोकसभा निवडणुकीचा निकाला जाहीर होणार आहे.याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर मीम्स तुफान व्हायरल होत आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पार्टी तिसऱ्यांदा आपला कार्यकाळ वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. तर दुसरीकडे राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष मागील दोन्ही वेळा पराभूत होऊन पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे. याच दरम्यान व्हायरल होणाऱ्या काही मीमवर नजर टाकुयात.

उत्तर प्रदेशमध्ये, कन्नौजमध्ये समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव ५२ हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे नेटकरी अखिलेश यादव यांच्यावर मीम बनवत आहेत. “शाळेत जे बोलतात ना अजिबात अभ्यास झाला नाही आणि नंतर तेच टॉप करतात ते हेच विद्यार्थी” असा मीम केला आहे.

दिल्लीतील सर्व सात लोकसभा जागांवर भाजप आघाडीवर आहे, मनोज तिवारी ४३ हजार पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत. राष्ट्रीय राजधानीत भाजपची थेट लढत काँग्रेस-आप युतीशी आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी पंजाबमधील लोकसभेच्या सर्व १३ जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आणि दावा केला की लोक “वाढत्या किमती आणि बेरोजगारीमुळे” भाजपमध्ये नाराज आहेत. “मला वाटते की आम्ही पंजाबमधील सर्व १३ जागा जिंकणार आहोत. आमच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात आम्ही वीज मोफत दिली आणि आम्ही चांगल्या शाळा, रुग्णालये आणि दवाखाने बनवत आहोत आणि रोजगार उपलब्ध करून देत आहोत. यामुळे लोक खूप आनंदी आहेत. आम्हाला १३ जागा मिळायला हव्यात,” केजरीवाल यांनी एएनआयशी बोलताना सांगितले.

निवडणुकांमध्ये पैसे वाटपासारखे बरेच प्रकार समोर येत असतात, अशा लोकांवर निवडणूक आयोगही लक्ष ठेवून असते तसेच कारवाईही होते. दरम्यान आज निकालाच्या पार्श्वभूमीवर असंच एक मीम व्हायरल होतंय.

हेही वाचा >> Photo: नरेंद्र मोदी वाराणसीमधून पिछाडीवर; नेटकरी म्हणतात “थांबा ही तर मोदींची खेळी” सोशल मीडियावर मीम्स पाहून पोट धरुन हसाल

कोट्यवधी भारतीयांसाठी निवडणुका हा चर्चेचा विषय राहिला आहे. दरम्यान सोशल मीडियावर मीम्सचा महापूर आला आहे, यावेळी एका वापरकर्त्याने पंचायत २ वेब सिरीजमधील एक दृश्य दर्शविणारा एक मेम शेअर केला आहे. या दृश्यात जितेंद्र कुमार, अभिषेक त्रिपाठीची भूमिका साकारत आहेत, इतर तीन लोकांसोबत बसले आहेत – या मीममधून जेव्हा निकाल लागेल त्यानंतर ज्येष्ठ मंडळी कशाप्रकारे चर्चा करायला बसतील सांगितलं आहे.