BJP Councillor Manish Chaudhary Assaulting Police : लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे आढळून आले. या व्हिडीओसह दावा करण्यात आला की, पश्चिम बंगालचे आमदार मन्सूर मोहम्मद दिमीर यांनी एका पोलिस कर्मचाऱ्याला भरहॉटेलमध्ये कानाखाली मारल्या. दरम्यान, व्हिडीओतही तसेच दृश्य दिसतेय. पण, खरंच पश्चिम बंगालच्या आमदाराने अशाप्रकारे कोणत्या पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे, तसेच व्हायरल व्हिडीओ नेमका कधीचा आहे, याविषयी जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर महावीर जैनने त्याच्या प्रोफाइलवर दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हिडीओ शेअर केला.

bjp manish chaudhary fact check
फॅक्ट चेक

इतर युजर्सदेखील अशाच दाव्यांसह व्हिडीओ शेअर करत आहेत.

bjp manish chaudhary
भाजपा मनिष चौधरी फॅक्ट चेक
bjp manish chaudhary
भाजपा मनिष चौधरी फॅक्ट चेक
bjp manish chaudhary
भाजपा मनिष चौधरी फॅक्ट चेक

तपास:

आम्ही InVid टूलवर व्हिडीओ अपलोड करून तपास सुरू केला. यावेळी रिव्हर्स इमेज सर्चदरम्यान आम्हाला Patrika वेबसाईटवर एक बातमी आढळली.

https://www.patrika.com/meerut-news/up-police-daroga-beaten-by-bjp-parshad-manish-chaudhary-3600748

या बातमीत असे नमूद करण्यात आले आहे की, शुक्रवारी रात्री राष्ट्रीय महामार्ग-५८ दिल्ली-डेहराडून महामार्गावरील ब्लॅक पेपर रेस्टॉरंटमध्ये आपल्या महिला मैत्रिणीसह आलेल्या पोलिस निरीक्षकाला भाजपा नगरसेवक मनीष चौधरी यांनी मारहाण केल्याचे प्रकरण वेगाने व्हायरल होत आहे. एकीकडे, डीजीपी ओपी सिंग यांनी एडीजी मेरठ झोनला नगरसेवकाच्या रेस्टॉरंटच्या परवान्याची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत, तर दुसरीकडे, भाजपाचे लोकप्रतिनिधी या प्रकरणात मौन बाळगत आहेत.

या घटनेशी संबंधित आणखी काही बातम्या आम्हाला आढळून आल्या.

https://timesofindia.indiatimes.com/city/meerut/assault-on-cop-days-after-fir-against-si-lawyer-duo-bjp-councillor-out-on-bail/articleshow/66481620.cms

https://timesofindia.indiatimes.com/city/meerut/bjp-councillor-who-beat-up-cop-found-dead/articleshow/82093955.cms

आम्हाला timesofindia च्या वेबसाइटवर व्हिडीओ रिपोर्टदेखील सापडला.

https://timesofindia.indiatimes.com/videos/city/lucknow/watch-supporters-open-celebratory-fire-as-bjp-leader-who-thrashed-up-cop-gets-bail/videoshow/66502052.cms

या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की: उत्तर प्रदेशातील एका पोलिस उपनिरीक्षकावर हल्ला करणारा भाजपा नगरसेवक मनीष चौधरी यांच्या समर्थकांनी चौधरी यांच्या सुटकेचा आनंद साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी मेरठमधील एका गर्दीच्या रस्त्याच्या मध्यभागी त्यांच्या चालत्या एसयूव्हीमधून गोळीबार केला. चौधरी यांचा जामीन अर्ज स्वीकारण्यात आला होता. यावेळी भाजपा नगरसेवकांच्या समर्थकांनी त्यांच्या सुटकेचा आनंद साजरा करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावरही पोस्ट केले. भाजपा नगरसेवक मनीष चौधरी यांना ???२ नोव्हेंबर??? रोजी जामीन मंजूर करण्यात आला. मनीष चौधरी एका रेस्टॉरंटमध्ये पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याबद्दल न्यायालयीन कोठडीत होते. दरम्यान, ही घटना रेस्टॉरंटमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.

निष्कर्ष:

उत्तर प्रदेशातील भाजपा नगरसेवक मनीष चौधरी यांनी पोलिस कर्मचाऱ्यावर केलेल्या हल्ल्याचा २०१८ चा व्हिडीओ आता पश्चिम बंगालच्या आमदाराने पोलिसावर हल्ला केल्याचा दावा करत व्हायरल होत आहे, त्यामुळे व्हायरल झालेला दावा दिशाभूल करणारा आहे.