Jharkhand Police Video Fact Check : लाईटहाऊस जर्नलिझमला एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे आढळून आले, ज्यामध्ये पोलिस काही लोकांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. या व्हिडीओसह असा दावा करण्यात आला आहे की, हा व्हिडीओ महाकुंभ मेळ्यात शाही स्नानासाठी आलेल्या भाविकांचा आहे, ज्यात उत्तर प्रदेश पोलीस भाविकांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण करीत गैरवर्तन करताना दिसत आहेत. पण महाकुंभ मेळ्यात खरंच अशी कोणती घटना घडली का? याविषयीचे सत्य जाणून घेऊ…
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर कमांडो अरुण गौतमने दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हिडीओ शेअर केला.
इतर युजर्सदेखील त्याच दाव्यासह हा व्हिडीओ शेअर करीत आहेत.
तपास :
आम्ही हा व्हिडीओ InVid टूलमध्ये अपलोड करून तपास सुरू केला. त्यातून मिळालेल्या कीफ्रेम्सवर आम्ही रिव्हर्स इमेज सर्च केले.
आम्हाला भाजपाचा नेता व राज्यसभेतील खासदार दीपक प्रकाश यांनी २ जानेवारी २०२५ रोजी एक्सवर अपलोड केलेला तोच व्हिडीओ सापडला.
कॅप्शनवरून असे दिसून आले की, हा व्हिडीओ झारखंडचा आहे.
Bhaskar.com वर एका महिन्यापूर्वी अपलोड करण्यात आलेल्या बातमीत आम्हाला व्हिडीओतील काही दृश्ये आढळून आली.
मुख्य शीर्षकावरून असे सूचित होते की, एका तरुणाचा मृतदेह एका नाल्यात आढळून आला. त्यावेळी या नातेवाइकांनी घटनास्थळी मोठा निषेध केला; पण त्यामुळे झालेली गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. ही घटना झारखंडमधील धनबादमध्ये घडली आहे.
आम्हाला ईटीव्ही भारत वेबसाइटवरही असेच दृश्य आढळून आले.
आम्हाला या घटनेबद्दल अनेक इतर बातम्या आढळल्या.
आम्हाला धनबाद रेझिस्टन्सवरील एक व्हिडीओ रिपोर्टदेखील मिळाला.
निष्कर्ष :
झारखंडमधील धनबाद येथील नाल्यात मृतदेह सापडल्यानंतर झालेल्या निदर्शनांचा आणि पोलिसांच्या लाठीचार्जचा व्हिडीओ प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याशी खोट्या दाव्यासह जोडला जात आहे. त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.