Waqf Bill Protest Fact Check Video : लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे आढळून आले आहे. त्यात मुर्शिदाबादनंतर आता पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा येथेही वक्फ विधेयकाविरुद्ध हिंसक आंदोलन झाल्याचा दावा करण्यात आला. यावेळी इंडियन सेक्युलर फ्रंट (ISF)च्या समर्थकांची पोलिसांशी चकमक झाली. यादरम्यान हिंदूंच्या मालकीच्या १५० एकरांपेक्षा जास्त शेतजमिनीची नासाडी झाल्याचा दावाही या व्हिडीओसह करण्यात आला आहे. पण, खरंच अशी कोणती घटना घडली का? याविषयीचे सत्य जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर लाल किशोर यादवने व्हायरल दाव्यासह व्हिडीओ शेअर केला.

इतर युजर्सदेखील अशाच दाव्यासह व्हिडीओ शेअर करीत आहेत.

तपास :

आम्ही InVid वर व्हिडिओ अपलोड करून तपास सुरू केला. यावेळी आम्हाला फेसबुकवरील व्हिडीओ सापडला. व्हिडीओ २८ नोव्हेंबर २०२४ रोजी पोस्ट करण्यात आला होता.

कॅप्शनमध्ये म्हटले होते: মুর্শিদপুর দরবার শরীফে অতর্কিত হাম লার রামশহর দরবার থেকে তীব্র নিন্দা ও প্রতিবাদ জানা। আচমকা অতর্কি* হাম লা করে কাপুরুষরা, হিম্মত যদি মারক-সুন্নাহ দিয়ে মোকাবেলা করো।

अनुवाद : मी रामशहर दरबारवरून मुर्शिदपूर दरबार शरीफवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. जे लोक अचानक दहशतवादी हल्ले करतात, तुमच्यात हिंमत असेल, तर त्यांचा थेट मुकाबला कुराण आणि सुन्नाहच्या आधारे करा.

आम्हाला २९ नोव्हेंबर २०२४ रोजी पोस्ट केलेली एक्सवरची एक पोस्टदेखील सापडली.

आम्हाला २८ नोव्हेंबर २०२४ रोजी फेसबुकवर पोस्ट केलेला आणखी एक व्हिडीओदेखील सापडला.

आम्हाला २८ नोव्हेंबर २०२४ रोजी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला आणखी एक व्हिडीओ आढळला.

पोस्टमध्ये म्हटले आहे (अनुवाद) : शेरपूरचा सर्वांत मोठा दर्गा तुटून पडला. यावेळी गाई-म्हशी आणि दुंबा यासह अनेक वस्तू लुटल्याचा आरोप होत आहे.

कीवर्ड सर्च वापरल्यावर आम्हाला २८ नोव्हेंबर २०२४ रोजी ‘द डेली स्टार’मध्ये प्रकाशित झालेली एक बातमीदेखील सापडली.

https://www.thedailystar.net/news/bangladesh/crime-justice/news/murshidpur-darbar-sharif-looted-torched-3764161

बातमीत म्हटले आहे : काल शंभरहून अधिक लोकांच्या बेशिस्त जमावाने शेरपूर सदर उपजिल्हा येथील दोजा पीर दरबार, ज्याला मुर्शिदपूर दरबार शरीफ, असेही म्हणतात, तिथे पुन्हा एकदा हल्ला केला.

आम्ही बांगलादेशातील एका फॅक्ट चेकरशी संपर्क साधला, ज्यांनी ही घटना बांगलादेशातील असल्याची पुष्टी केली आहे. २७ नोव्हेंबर २०२४ रोजी ढाका ट्रिब्यूनवरील एका बातमीची लिंकदेखील शेअर केली.

https://www.dhakatribune.com/bangladesh/nation/366392/7-held-over-attack-on-sherpur%E2%80%99s-murshidpur-darbar

बातमीत म्हटले आहे की : मंगळवारी सकाळी शेरपूरच्या लच्छमनपूर भागात ख्वाजा बद्रुद्दुजा हैदर (दोजा पीर) यांच्या नेतृत्वाखालील धार्मिक प्रतिष्ठान मुर्शिदपूर दरबार शरीफची तोडफोड आणि लूटमार केल्याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले.

आम्हाला जमुना टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलवर या घटनेचा व्हिडीओ रिपोर्टदेखील सापडला.

निष्कर्ष :

बांगलादेशातील शेरपूर येथील मुर्शिदपूर दरबार शरीफवरील हल्ल्याचा एक जुना व्हिडीओ पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील हिंसाचाराच्या अलीकडील घटनेचा असल्याचा खोटा दावा करीत शेअर केला जात आहे. त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.