Samay Raina Viral Video : “इंडियाज गॉट लेटेंट”च्या अलीकडच्या एका एपिसोडमुळे वादात सापडलेल्या स्टँड-अप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा नव्या कारणामुळे चर्चेत आला आहे. वादानंतर समय रैनाचे “इंडियाज गॉट लेटेंट’चे भारतातील शो रद्द करण्यात आले. या वादात आता समय रैनाचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

व्हिडीओमध्ये समय लोकांना रेकॉर्ड करू नका असे सांगत म्हणतो (भाषांतर) की, “गेल्या एका तासात मी जे काही बोललो ते मी तसा माणूस नाही. मी खरं सांगतोय, हे कव्हर-अप नाही. मी तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मी सोडून देऊ शकलो असतो, पण तुमच्यासमोर भंपकपणा उघड करतोय, मी तुम्हाला हसवण्यासाठी विनोद लिहितो. त्याचा काही अर्थ नाही की हा एक खेळ आहे, हे चिट कोड आहेत. माझे आजोबा जिवंत आहेत.” यावर सर्व प्रेक्षक हसू लागतात. दरम्यान, समय रैनाचा हा व्हिडीओ ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमुळे झालेल्या वादानंतर असल्याचा दावा करण्यात आला आहे. इतकेच नाही तर या व्हिडीओतून त्याने घडलेल्या वादावर मौन सोडल्याचाही दावा केला जात आहे. पण, खरंच हा व्हिडीओ त्यादरम्यानचा आहे का, याविषयीचे सत्य जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

यूट्यूब चॅनेल, सेलिब्रिटी XYZ ने त्याच्या प्रोफाइलवर व्हिडीओ शेअर केला.

व्हिडीओवरील मजकूर असा होता की : अलीकडील वादावर समयने उत्तराने दिले उत्तर

हाच व्हिडीओ इतर सोशल मीडिया हँडलवरदेखील अशाच दाव्यासह शेअर केला जात होता.

तपास :

आम्ही व्हिडीओमधून मिळालेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च केला, परंतु आम्हाला फक्त व्हायरल दाव्यासह शेअर केलेला एक सेम व्हिडीओ मिळाला.

यामुळे आम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड झालेल्या सगळ्या रील्सवरचे कमेंट सेक्शनची तपासणी करावी लागली. वादानंतर अनेक युजर्सनी हा व्हिडीओ जुना आहे आणि अलीकडचा नाही अशी कमेंट केली आहे.

‘व्हायरल इन इंडिया’ या इन्स्टाग्राम हँडलवर आम्हाला असाच एक व्हिडीओ सापडला.

राज परमार या सोशल मीडिया युजरने व्हिडीओवर कमेंट केली होती की, त्याने डिसेंबर २०२४ मध्ये अहमदाबादमध्ये व्हिडीओ काढला होता.

त्यामुळे व्हिडीओ सार्वजनिकरित्या उपलब्ध असेल याची खात्री होती. त्यानंतर आम्ही राज परमार यांचे यूट्यूब चॅनेल तपासले, तेव्हा त्यांनी अपलोड केलेला व्हिडीओ आढळून आला.

व्हिडीओला २२ हजार लाईक्स आणि पाच लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले होते. हा व्हिडीओ १५ फेब्रुवारी २०२५ रोजी अपलोड करण्यात आला होता. युजरने अहमदाबाद हा हॅशटॅगदेखील वापरला होता.

त्यानंतर आम्ही इन्स्टाग्रामद्वारे राज परमार यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी पुष्टी केली की, हा व्हिडीओ त्याने डिसेंबर २०२४ मध्ये अहमदाबाद शोदरम्यान काढला होता.

तथापि, आम्हाला livemint.com वर एक बातमी मिळाली, ज्यामध्ये कॅनडातील एडमंटन येथील मायर होरोविट्झ थिएटरमध्ये झालेल्या लाईव्ह शोमध्ये समय रैनाने अलीकडेच झालेल्या रणवीर अलाहबादिया वादावर भाष्य केले होते आणि वैयक्तिक संघर्षाविषयी भाष्य केले होते.

https://www.livemint.com/entertainment/samay-raina-on-ranveer-allahbadia-controversy-maybe-my-time-is-bad-now-but-remember-11739886619702.html

निष्कर्ष :

डिसेंबर २०२४ मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या समय रैनाच्या शोमधील एक जुना व्हिडीओ ‘इंडियाज गॉट लेटेंट’ वादाशी संबंधित असल्याचे सांगून तो आता व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला दावा दिशाभूल करणारा आहे.

Story img Loader