PM Modi CM Yogi Sant Kabir Samadhi Video : लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होत असल्याचे आढळून आला. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी एका समाधीस्थळी चादर चढवताना दिसत आहेत. अनेक पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलीकडेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह संत कबीर समाधीस्थळी भेट दिली होती. यावेळी ते संत कबीर समाधीवर चादर चढवतानाही दिसतायत. पण, हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे याविषयीचे सत्य जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर ए. के. तिवारी यांनी खोट्या दाव्यांसह त्यांच्या अकाउंटवर व्हिडीओ शेअर केला.

इतर युजरदेखील अशाच दाव्यांसह व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास:

व्हायरल व्हिडीओ InVid वर अपलोड केल्यानंतर त्यातून मिळालेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही तपास सुरू केला.

यावेळी आम्हाला ANI न्यूजच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ आढळून आला.

कॅप्शनमध्ये म्हटले आहे (भाषांतर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कबीर समाधी स्थळाला भेट दिली – उत्तर प्रदेश न्यूज. हा व्हिडीओ २८ जून २०१८ रोजी अपलोड करण्यात आला होता.

आम्हाला यासंबंधी अनेक बातम्याही आढळून आल्या.

https://www.business-standard.com/multimedia/video-gallery/general/watch-pm-modi-up-cm-yogi-visit-kabir-samadhi-sthal-66696.htm

https://www.jansatta.com/rajya/uttar-pradesh/uttar-pradesh-cm-yogi-adityanath-refused-to-wear-skull-cap-at-sant-kabir-ma खादिम-अत-मघर-संत-कबीर-नगर-पीएम-नरेंद्र-मोदी-यांनी-भेट-टू-डे/697559/

या बातम्यांमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर येथील संत कबीर समाधी स्थळाला भेट दिली. यावेळी त्यांच्याबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. संत कबीर नगर जिल्ह्यातील मगहर शहरातील अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान मोदी आज लखनऊमध्ये पोहोचले.

निष्कर्ष :

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा संत कबीर समाधी स्थळाला भेट दिल्याचा जुना व्हिडीओ आता अलीकडील असल्याच दावा करत व्हायरल केला जात आहे, त्यामुळे व्हायरल झालेला दावा दिशाभूल करणारा आहे.