Dr. S. Jaishankar And Trump Fact Check Video : लाईटहाऊस जर्नलिझमला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभातील एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होत असल्याचे आढळून आले. या व्हिडीओबरोबर असा दावा करण्यात आला की, ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभात भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. तसेच त्यांना पहिल्या रांगेतून मागच्या रांगेत जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. पण, खरंच अशाप्रकारची कोणती घटना घडली का? याविषयीचे सत्य जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर विनय कुमार डोकानियाने खोट्या दाव्यांसह व्हिडीओ शेअर केला.

अर्काइव्ह लिंक.

https://archive.ph/z8I4z

इतर युजर्सदेखील अशाच दाव्यांसह व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास:

व्हिडीओ क्लिप सोमवार, २० जानेवारी २०२५ रोजीच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभातील होती.

आम्हाला व्हाईट हाऊसच्या यूट्यूब चॅनेलवर या समारंभाचा लाईव्ह व्हिडीओ सापडला.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हायरल क्लिपमधील दृश्ये या व्हिडीओत सुमारे ३४ मिनिटे ०५ सेकंदाच्या दरम्यान पाहता येत आहेत.

एक महिला प्रतिनिधी समोरून चालत येताना दिसली, अशाप्रकारे ती समारंभात अनेकदा दिसली. पण, त्याआधी ती एका कॅमेरामनच्या समोरून जाताना दिसली. ही महिला प्रतिनिधी कॅमेरामनजवळ गेली आणि त्याला तिने मागे जाण्यास सांगितले. व्हिडीओत ३५ मिनिटे १० सेकंदाच्यादरम्यान कॅमेरामन मागे जाताना दिसतो.

image.png

डॉ. एस. जयशंकर यांनी त्यांच्या एक्स हँडलवर शेअर केलेल्या फोटोंवरून असे दिसून आले की, समारंभात त्यांना पुढच्या रांगेत बसण्याची परवानगी होती.

निष्कर्ष :

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान डॉ. एस. जयशंकर यांना एका महिला प्रतिनिधीने मागे जाण्यास सांगितले नव्हते. त्यांच्या समोर उभ्या असलेल्या एका कॅमेरामनला तिने असे करण्यास सांगितले होते, त्यामुळे ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांचा अपमान झाला किंवा त्यांना मागच्या रांगेत जाण्याच्या सूचना केल्या अशा प्रकारचा व्हारयर होणारा दावा खोटा आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta fact check video dr s jaishankar video falsely claims asked to move back at swearing in ceremony of donald trump sjr