Punjab Police Fact Check Video : लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेला एक व्हिडीओ आढळून आला. या व्हिडीओबरोबर असा दावा करण्यात आला की, पंजाबमधील पोलिस अधिकारी वर्दीत असताना खुलेआमपणे ड्रग्जचे सेवन करताना दिसले. यावेळी एका पत्रकाराने व्हिडीओ रेकॉर्ड करून त्यांची पोलखोल केली. पत्रकार पळून जाणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचा पाठलाग करत पकडतानाही दिसतो. पण, खरंच पंजाबमध्ये अशी कोणती घटना घडली का? यामागचं सत्य जाणून घेऊ..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर विनय श्रीवास्तव यांनी व्हायरल व्हिडीओ दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह शेअर केला.

पाहा अर्काइव्ह व्हर्जन
https://archive.ph/rdXfS

इतर युजरदेखील त्याच दाव्यासह व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास :

आम्ही व्हिडीओतून काढलेल्या स्क्रीनशॉटवर रिव्हर्स इमेज सर्च चालवून तपास सुरू केला. यावेळी आम्हाला thetrendingindian या इन्स्टाग्राम हँडलवर अपलोड केलेला व्हिडीओ सापडला, ज्यामध्ये दावा करण्यात आला होता की, हा व्हिडीओ पाकिस्तानच्या पंजाबमधील आहे.

हा व्हिडीओ २१ डिसेंबर २०२४ रोजी अपलोड करण्यात आला होता.

त्यानंतर आम्ही इन्स्टाग्राम हँडलवरून मिळालेल्या माहितीचा वापर करून गूगल कीवर्ड सर्च केला.

आम्हाला एबीपी लाईव्ह वेबसाइटवर एक लेख सापडला.

https://www.abplive.com/trending/pakistan-punjab-police-jawan-caught-red-handed-while-selling-hashish-openly-video-goes-viral-2847395

रिपोर्टमध्ये नमूद केले आहे (अनुवाद) : अलीकडेच, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये वर्दीत असताना पाकिस्तानचा एक पोलिस कर्मचारी खुलेआम ड्रग्ज विकताना दिसला. पण, जेव्हा त्याला एका पत्रकाराने रंगेहाथ पकडले, तेव्हा तो गुन्हेगार असल्यासारखा पळून गेला.

आम्हाला पाकिस्तान पीटीआय नेत्या फातिमा यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ सापडला.

आम्हाला एक्स हँडलवर पोस्ट केलेला व्हिडीओदेखील सापडला, ज्यावर ‘एसए टाइम्स’ असा लोगो होता.

त्यानंतर आम्ही एसए टाइम्सचे फेसबुक पेज शोधले.

आम्हाला एसए टाइम्सच्या फेसबुक पेजवर ४ जानेवारी रोजी पोस्ट केलेला व्हिडीओ सापडला.

कॅप्शनमध्ये म्हटले आहे : एका पोलिस अधिकाऱ्याला ड्युटीवर असताना गांजा विकताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

निष्कर्ष :

पंजाब पोलिसांचा ड्रग्ज विक्री करतानाचा व्हायरल व्हिडीओ भारतातील नाही तर पाकिस्तानच्या पंजाबमधील आहे, त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta fact check video from pakistan falsely claims to show punjab police using selling drugs sjr