Mahakumbha 2025 Fact Check Video : लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होत असल्याचे आढळून आले, ज्यात प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात पु्न्हा एकदा चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडीओत लोक सैरावैरा पळताना दिसतायत, तर काही जण चक्काचूर झालेल्या गाड्या अन् बॅरीगेट्स रस्त्यातून बाजूला करताना दिसतायत. पण, खरंच महाकुंभमेळ्यात पुन्हा चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली का याबाबत आम्ही सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एक वेगळं सत्य समोर आलं, ते काय होतं जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

फेसबुकवरील व्हायरल सेलिब्रिटी नावाच्या प्रोफाइलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

इतर युजर्सदेखील अशाच दाव्यांसह व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास:

व्हिडीओमधून मिळालेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही तपास सुरू केला.

आम्हाला १६ जानेवारी रोजी इन्स्टाग्रामवर अपलोड केलेला व्हिडीओ आढळला.

आम्हाला ११ जानेवारी रोजी फेसबुक प्रोफाइलवर अपलोड केलेलादेखील व्हिडीओ आढळला. प्रयागराजमधील चेंगरा-चेंगरीची घटना २९ जानेवारी रोजी घडली होती.

कॅप्शनमध्ये म्हटले आहे : अंबरीकलातील अपघात दुर्दैवी घटना (भाषांतर)

आम्हाला आढळले की, दुसऱ्या एका पाकिस्तानी युजरने इस्लामाबाद हॅशटॅगसह हा व्हिडीओ अपलोड केला होता.

आम्ही जेव्बा अंबरीकला पाकिस्तानसह कीवर्ड शोध सर्च केला तेव्हा आम्हाला आढळले की, तो शब्द ‘अंबरी कला’ असा होता.

याद्वारे, आम्हाला पाकिस्तानातील करकमधील सिंधू महामार्गावरील अंबरीकला चौकात झालेल्या अपघाताबद्दलच्या बातम्या सापडल्या. हा अपघात जानेवारी २०२५ मध्ये घडला होता.

https://tribune.com.pk/story/2521463/truck-accident-claims-12-lives-in-karak
https://www.thenews.com.pk/print/1271329-12-killed-25-injured-in-karak-accident

स्थानिक अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले की, करकमधील सिंधू महामार्गावरील अंबरीकला चौकात २२ चाकी ट्रकने नियंत्रण गमावून अनेक वाहनांना धडक दिल्याने किमान १२ जणांचा मृत्यू झाला आणि १३ जण जखमी झाले.

आम्हाला यावेळी यूट्यूबवरील मशरिक टीव्हीच्या बातमीच्या एका व्हिडीओमध्ये सेम तीच दृश्ये पाहायला मिळाली.

आम्हाला आढळले की, इतर अनेक YouTube चॅनेल्सनी त्यांच्या YouTube हँडलवर हा व्हिडीओ अपलोड केला होता.

निष्कर्ष :

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा करत व्हायरल होणारा व्हिडीओ प्रत्यक्षात पाकिस्तानमधील आहे, त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.

Story img Loader