Former pm jawaharlal nehru Kumbh Snan Fact Check Photo : लाईटहाऊस जर्नलिझमला देशाचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा एक फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होत असल्याचे आढळून आले आहे. या फोटोसह युजर्सने असा दावा केला की, या फोटोमध्ये पंतप्रधान जवाहरलाल नेहरू कुंभ मेळ्यात पवित्र स्नान करताना दिसत आहेत. पण, खरंच फोटोत दावा केल्याप्रमाणे जवाहरलाल नेहरूंनी त्या काळी कुंभ मेळ्यात सहभागी होऊन पवित्र स्नान केले होते का? याविषयीचे सत्य जाणून घेऊ…
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर अरविंद चोटिया यांनी दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह हा फोटो शेअर केला आहे.
इतर युजर्स देखील अशाच दाव्यांसह हा फोटो शेअर करत आहेत.
तपास:
व्हायरल झालेल्या फोटोवर रिव्हर्स इमेज सर्च करून, आम्ही तपास सुरू केला.
तपासामध्ये आम्हाला एका पोस्टमध्ये नेहरू अलाहाबादमध्ये त्यांच्या आईच्या अस्थी विसर्जित करताना दिसल्याचे सूचित झाले.
आम्हाला reckontalk.com वर देखील हा फोटो सापडला.
कॅप्शनमध्ये म्हटले आहे : The caption said: Nehru’s Farewell: A Private Grief Amidst Public Service. This poignant image shows Jawaharlal Nehru, India’s first Prime Minister, performing a deeply personal ritual that ties him to his cultural roots. (कॅप्शनमध्ये म्हटले आहे (भाषांतर) : नेहरूंचा निरोप : सार्वजनिक सेवेतील एक खासगी शोक. या मार्मिक फोटोत भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू त्यांच्या सांस्कृतिक मुळांशी जोडणारा एक खोलवरचा वैयक्तिक विधी करताना दिसत आहेत.
आम्हाला हा फोटो ‘इंडिया टुडे’च्या वेबसाइटवरील एका लेखात देखील आढळून आला.
https://www.indiatoday.in/magazine/society-and-the-arts/story/20060306-book-review-nehrus-personal-histories-by-mushirul-hasan-and-priya-kapoor-783526-2006-03-05
फोटोच्या खाली- जवाहरलाल नेहरू अलाहाबादमध्ये त्यांच्या आईच्या अस्थींचे विसर्जन करताना, असा मजकूर लिहिलेला आहे.
निष्कर्ष:
माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू कुंभ मेळ्यात पवित्र स्नान करत असल्याचा दावा केला जाणारा फोटो १९३८ चा आहे; पण प्रत्यक्षात हा फोटो कुंभ मेळ्यातील नाही, तर पंतप्रधान नेहरू अलाहाबादमध्ये त्यांच्या आईच्या अस्थींचे विसर्जन करतानाचा आहे. १९३८ मध्ये प्रयागराज म्हणजे आधीचे अलाहाबाद येथे पंतप्रधान नेहरू त्यांच्या आईंच्या अस्थी विसर्जित करण्यासाठी गेले होते. त्यामुळे व्हायरल फोटोद्वारे केला जाणारा दावा दिशाभूल करणारा आहे.