गणपती हे महाराष्ट्राचं आराध्यदैवत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने लोकसत्ता ऑनलाइनने वाचकांसाठी खास क्विझचं आयोजन केलं होतं. वाचकांनी याला भरभरून प्रतिसाद दिला. या क्विझमध्ये गणपतीशी संबंधित कथा, मिथकं, आख्यायिका, पूजाविधी यावर धारित दहा प्रश्न विचारण्यात आले होते. वाचकांनी आपल्या ज्ञानाचा, माहितीचा प्रत्यय घडवत अचूक उत्तरं दिली. विजेत्यांचं मन:पूर्वक अभिनंदन. विजेत्यांना लेन्सकार्टच्या कूपनने गौरवण्यात आलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यशस्वी स्पर्धकांची नावं अशी आहेत- संजय मोडखारकर, मुग्धा मेढेकर, मोहन ओसवाल, राधिका भोसले, रवींद्र पवार, नवनाथ कीर्तने, योगेश कतारे, प्रतीक राजूरकर, राजीव महामूनकर आणि रावसाहेब चौगुले यांना सन्मानित करण्यात आलं.

क्विझच्या निमित्ताने गणपतीशी निगडीत गोष्टी, पूजाविधी, आख्यायिका यावर आधारित प्रश्न विचारण्यात आले होते. अचूक उत्तरांसह वाचकांनी गणपतीसंदर्भात अभ्यासपूर्ण वाचक असल्याचं सिद्ध केलं.

लोकसत्ता ऑनलाइनच्या वाचकांनी या क्विझला अतिशय उत्साहाने प्रतिसाद दिला. क्विझमधील सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तरं असंख्य वाचकांनी दिली. कमीत कमी वेळेत उत्तरं देणाऱ्या १० वाचकांची विजेते म्हणून निवड करण्यात आली आहे. यापुढेही आकर्षक बक्षीसांसह सादर होणाऱ्या क्विझला तुमचा असाच प्रतिसाद असेल याची खात्री वाटते.

लोकसत्ता ऑनलाइनने याआधी क्रिकेट वर्ल्डकप, नवरात्र अशा विविध निमित्ताने आयोजित क्विझलाही वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ganeshotsav quiz winners felicitated psp