ब्रिटनचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि माजी कुलगुरू ऋषी सुनक यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ऋषी पत्नी अक्षता मूर्तीसोबत गोपूजन करताना दिसत आहेत. अक्षता मूर्ती इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांची मुलगी आहे. व्हिडीओमध्ये ऋषी सुनक पत्नी अक्षतासोबत गायीसमोर आरती करताना दिसत आहे. पूजेदरम्यान त्यांच्या जवळ उभा असलेला पुजारी त्यांना इतर पद्धती सांगत आहे.

या व्हिडीओमध्ये सुरूवातीला ऋषी सुनक पितळेचं भांडं हातात पडकलेले दिसत आहे, या भांड्यातून ते गायीला पाणी अर्पण करत आहेच. पुजारी त्यांच्या हातात दिवा देतात, दिवा लावून ते त्यांची पूजा पूर्ण करतात. त्यांच्यासोबत पत्नी अक्षता शेजारी उभ्या असलेल्या असून गायीसमोर आरती करताना दिसते. या व्हिडीओमध्ये गायीलाही रंगांनी सजवलेली दिसत आहे.

आणखी वाचा : कोरियन आईने मुलाला भारतीय राष्ट्रगीत शिकवले, गोंडस मुलाने कसं गायलं “जन-गण-मन…”, पाहा VIRAL VIDEO

काही दिवसांपूर्वी जन्माष्टमी साजरी करण्यासाठी सुनक नुकतेच लंडनमधील भक्तिवेदांत मनोर मंदिरात आले होते. यावेळच्या पूजेचे फोटो त्यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्यानंतर आता त्यांनी बैलपोळा सण साजरा करत गोपूजन केलंय. याचा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओवरून यासोबतच सनातन धर्म आणि संस्कृतीची वैशिष्ट्ये यावरून नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आलंय.

आणखी वाचा : Dosa Printer: कधी विचार केला होता का? ‘डोसा प्रिंटर’ही येईल, VIRAL VIDEO पाहून लोक थक्क झाले

मारन सेवाथल यांनी सुनक दाम्पत्यांचा गोपूजनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबत मॅरॉनने लिहिले की, ‘ब्रिटनचे संभाव्य पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नीने लंडनमध्ये गौ मातेची पूजा केली. जागतिक पटलावर भारत राज्य करत असल्याचे यातून दिसून येते. आमचा समृद्ध सांस्कृतिक वारसा दाखवायला आम्हाला आता लाज वाटत नाही. जय सनातन धर्म.”

आणखी वाचा : नाशिक हादरलं….मैत्रीला नकार दिला म्हणून दिवसाढवळ्या पेट्रोल पंच कर्मचारी महिलेवर केला चाकूने वार, घटनेचा VIDEO VIRAL

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Ganesh Chaturthi 2022: ३५६ वर्षे जुन्या या अद्भूत मंदिरात मुर्ती अनेकवेळा समुद्रात फेकल्यानंतरही परतून येत होती…

ब्रिटनचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून बोरिस जॉन्सन यांची जागा घेण्याच्या शर्यतीतील दोन प्रमुख उमेदवारांपैकी एक आहेत. त्यांचा सामना ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस यांच्याशी होत असून, लिझ ट्रस याचं पारडं त्यांच्यापेक्षा काहीसं जड असल्याचं बोलले जात आहे. सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्ष अखेर ५ सप्टेंबर रोजी नवीन नेत्याची निवड करेल, जो सुनक यांच्या भवितव्याचा निर्णय घेईल. त्यांची पत्नी अक्षता मूर्ती ही भारतातील आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी आहे.

Story img Loader