Long Weekend List 2024: नवीन वर्षातील दुसरा लाँग विकेंड गुरुवारपासून सुरू होत आहे. यावेळी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन शुक्रवारी आहे. या आठवड्यात शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस सलग सुट्ट्या आहेत. तीन दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही शहरापासून जवळच लाँग विकेंड ट्रिपला जाण्याचा प्लॅन करू शकता. तुम्हीही नवीन वर्षात सुट्टीवर जाण्याचा विचार करत असाल तर लाँग विकेंडची लिस्ट पाहू शकता. यावेळी बहुतेक सण सुट्ट्यांच्या दिवशी म्हणजे शनिवार आणि रविवारी येत नाहीत, त्यामुळे तुम्ही लाँग विकेंडचा पुरेपूर फायदा घेऊ शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कारण वर्षभरात एक नाही तर जवळपास १३ लाँग विकेंड तुम्हाला मिळणार आहेत, ज्यात फिरायला जाण्यासाठी तुम्हाला सुट्ट्यांचे प्लॅन करता येतील. लाँग विकेंड कोणत्या महिन्यात आणि कधी आहे ते जाणून घेऊ…

जानेवारी २०२४ मधील दुसरा लाँग वीकेंड

शुक्रवार- २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन)

शनिवार- २७ जानेवारी

रविवार – २८ जानेवारी

तुम्हाला तीन दिवसांचा विकेंड मिळत आहे.

मार्च २०२४ मधील पहिला लाँग वीकेंड

शुक्रवार- ८ मार्च (महाशिवरात्री)

शनिवार- ९ मार्च (गुढी पाडवा)

रविवार – १० मार्च

मार्चमधील दुसरा लाँग वीकेंड

शनिवार- २३ मार्च

रविवार – २४ मार्च

सोमवार- २५ मार्च (होळी)

मंगळवार – २६ मार्च (पर्यायी-एक दिवस सुट्टी घेऊ शकता)

मार्चमधील तिसरा लाँग वीकेंड

शुक्रवार- २९ मार्च (गुड फ्रायडे)

शनिवार- ३० मार्च

रविवार- मार्च ३१ (इस्टर)

(मार्चमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करणाऱ्यांना सर्वात मोठा लाँग विकेंड मिळाला आहे.)

मे २०२४ मधील लाँग विकेंड

गुरुवार- २३ मे (बुद्ध पौर्णिमा)

शुक्रवार- २४ मे (दिवसाची सुट्टी घ्या)

शनिवार- २५ मे

रविवार – २६ मे

डोंगराळ भागात रंगला मुलींचा जबरदस्त क्रिकेटचा सामना; चौकार, षटकार अन्…; VIDEO पाहून आनंद महिंद्राही भारावले, म्हणाले…

जून २०२४ मधील लाँग विकेंड

शनिवार- १५ जून

रविवार- १६ जून

सोमवार- १७ जून (बकरी ईद)

ऑगस्ट २०२४ मधील लाँग विकेंड

गुरुवार- १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन)

शुक्रवार- १६ ऑगस्ट (एक दिवस सुट्टी घेऊ शकता)

शनिवार- १७ ऑगस्ट

रविवार- १८ ऑगस्ट

सोमवार- १९ ऑगस्ट (रक्षा बंधन)

ऑगस्टमधील दुसरा लाँग विकेंड

शनिवार- २४ ऑगस्ट

रविवार- २५ ऑगस्ट

सोमवार- २६ ऑगस्ट (जन्माष्टमी)

सप्टेंबर २०२४ मधील लाँग विकेंड

गुरुवार- ५ सप्टेंबर (ओणम)

शुक्रवार- ६ सप्टेंबर (दिवस सुट्टी घेऊ शकता)

शनिवार- ७ सप्टेंबर (गणेश चतुर्थी)

रविवार- ८ सप्टेंबर

सप्टेंबरमधील दुसरा लाँग वीकेंड

शनिवार- १४ सप्टेंबर

रविवार- १५ सप्टेंबर

सोमवार- १६ सप्टेंबर (ईद मिलाद उन नबी)

ऑक्टोबर २०२४ मधील लाँग विकेंड

शुक्रवार- ११ ऑक्टोबर (महानवमी)

शनिवार- १२ ऑक्टोबर (दसरा)

रविवार- १३ ऑक्टोबर

नोव्हेंबर २०२४ मधील लाँग विकेंड

शुक्रवार- १ नोव्हेंबर (दिवाळी)

शनिवार- २ नोव्हेंबर

रविवार- ३ नोव्हेंबर (भाऊबीज)

नोव्हेंबरमधील दुसरा लाँग विकेंड

शुक्रवार- १५ नोव्हेंबर (गुरु नानक जयंती)

शनिवार-१६ नोव्हेंबर

रविवार-१७ नोव्हेंबर

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Long weekends in 2024 new year holidays list second long weekend in january month starts from thursday republic day leave sjr