India’s Most-Searched Travel Destinations Of 2024: प्रवास हा नेहमीच रोमांचक असतो, नवीन संस्कृती आणि साहसे अनुभवण्याची संधी देतो. साथीच्या रोगानंतर, लोक पुन्हा नव्याने नवनवीन ठिकाणी भेट देण्यासाठी आणि पुन्हा जगाशी संपर्कात येण्यास उत्सुक आहेत. वास्तविक आणि अर्थपूर्ण अनुभव देणाऱ्या ठिकाणांना भेट देत आहे. उल्लेखनीय म्हणजे, सुमारे८- % प्रवासी आता जगातील केवळ १०% पर्यटन स्थळांना भेट देत आहेत, मॅकिन्से(McKinsey )च्या अलवाहातून नुकतेच समोर आले आहे.
भारतात, पारंपारिक पर्यटन स्थळांच्याबरोबरीने हटके ठिकाणी प्रवास करण्याच्या लोकप्रियता वाढत असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा –Morning Mantra: हिवाळ्यात सकाळी उठल्यानंतर तुमची ही सवय दिवसभर तुम्हाला ठेवेल आनंदी!
.
२०२४ मध्ये भारतातील Google वर सर्वाधिक शोधलेली टॉप १० पर्यटन स्थळे(Top 10 most searched travel destinations on Google in India in 2024) :
काही दिवसांत २०२५ वर्ष सुरू होईल. दरम्यात त्याआधी २०२४मध्ये गुगलवर भारतात सर्वाधिक शोधल्या गेलेल्या प्रवास स्थळांबाबत जाणून घेऊया
१)अझरबैजान
२) बाली, इंडोनेशिया
३) मनाली, भारत
४) कझाकस्तान
५) जयपूर, भारत
६) जॉर्जिया
७) मलेशिया
८) अयोध्या, भारत
९) काश्मीर, भारत
१०) दक्षिण गोवा, भारत
स्त्रोत: गुगल सर्च ट्रेंडस् (Google Search Trends)
कृपया लक्षात ठेवा: ट्रेंडिंग शोध हे सर्वात लोकप्रिय शोध आहेत ज्यात २०२३च्या तुलनेत २०२४ मध्ये ट्रॅफिरमध्ये मोठी वाढ झाली आहे..
प्रमुख ठळक मुद्दे:
अझरबैजान, कझाकस्तान आणि जॉर्जिया यांसारखे काकेशस प्रदेशातील(काळा समुद्र आणि कॅस्पियन समुद्र यांच्यामध्ये वसलेला आहे आणि येथे काकेशस पर्वत आहेत) नवीन उदयास आलेले देश, २०२४ मध्ये भारतीयांसाठी अधिकाधिक इच्छित पर्यटन स्थळे म्हणून उदयास येत आहेत.
एक उल्लेखनीय गोष्ट महणजे अझरबैजानची राजधानी बाकू येथे युरोप आणि आशिया या दोन्ही देशांतील प्रभाव दिसून येतो आणि सुलभ ई-व्हिसा प्रक्रियेमुळे २०२४ मध्ये ते भारतीयांसाठी पर्यटनाचे आकर्षण केंद्र बनले आहे.
युरोप आणि आशिया या दोन्ही देशांतील प्रभावांमुळे त्यांच्या अद्वितीय संस्कृती, चित्तथरारक निसर्ग सौंदर्य, समृद्ध आणि प्राचीन सभ्यता इतिहास आणि तुलनेने कमी प्रवास खर्च यामुळे या स्थळांच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे, ज्यामुळे भारतातील आणि जगभरातील पर्यटकांची संख्या वाढत आहे.
भारतातील पवित्र शहर अयोध्येच्या लोकप्रियतेत यंदा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, मुख्यत्वे हिंदूंसाठी एक महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळ असलेल्या राम मंदिरामुळे.
Booking.com च्या अलीकडील अहवालानुसार, राममंदिराच्या विकासामुळे शहर आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व याविषयी नवीन रूची निर्माण झाली आहे, ज्यामुळे ते २०२४ मध्ये दुसरे-सर्वाधिक ट्रेंडिंग कौटुंबिक सुट्टीचे ठिकाण बनले आहे. Booking.com च्या अलीकडील अहवालानुसार, राममंदिराच्या विकासामुळे शहर आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व याविषयी नवीन रूची निर्माण झाली आहे, ज्यामुळे ते २०२४ मध्ये दुसरे-सर्वाधिक ट्रेंडिंग कौटुंबिक भेटीचे पर्यटन स्थळ बनले आहे.
हेही वाचा – बीटचे सेवन केल्याने रक्तातील सारखेवर नियंत्रित करता येईल का? मधुमेही रुग्णांनी बीटचे सेवन कसे करावे?
तर जयपूर, मनाली, काश्मीर आणि दक्षिण गोवा ही सुप्रसिद्ध भारतीय पर्यटन स्थळे आहेत, जयपूरचा समृद्ध इतिहास आणि संस्कृती, मनालीचे साहसी खेळ, काश्मीरचे चित्तथरारक नैसर्गिक सौंदर्य आणि दक्षिण गोव्याची वसलेली- यांसारख्या कारणांमुळे त्यांची लोकप्रियता सतत वाढत आहे.