Kedarnath Video : सध्या श्रावण महिना सुरू आहे. श्रावण या महिन्यात शिवशंकराची पूजा केली जाते. महादेवाच्या दर्शनासाठी शिवभक्त मंदिरात जातात. केदारनाथ येथे सुद्धा दरदिवशी लाखो भक्तांची गर्दी दिसून येते. सध्या सोशल मीडियावर केदारनाथला जाणाऱ्या वृद्ध जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, केदारनाथ धामला निघालेले हे जोडपे काठीचा आधार घेऊन यात्रा करत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही भारावून जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या सोशल मीडियाच्या या जगात मोबाईलशिवाय कोणीही राहू शकत नाही. अनेकजण यात्रा करताना मोबाईल वापरतात. फोटो -व्हिडीओ काढतात पण या जोडप्याजवळ कोणताही मोबाईल फोन नाही. फक्त शंकराविषयीची भक्ती मनात ठेवून हे जोडपे केदारनाथची यात्रा करत आहे. या दोघांचे वय अंदाजे ८०-९०च्या जवळपास असावे.

हेही वाचा : उखाणा घ्यावा तर असा … आजीने घेतला सुंदर खानदेशी उखाणा; व्हिडीओ एकदा पाहाच

this_is_shubhamgupta या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “हे दोघेही शिवाचे खरे भक्त आहे”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “शिव या जोडप्याला शक्ती दे.. २२ किमीची यात्रा..हे दोघेही खूप दृढनिश्चयी आहे.” तर एका युजरने लिहिले, “असे भक्त नेहमीच शिवशंकराला प्रिय असतात… त्यांना दीर्घायुष्य लाभो…” अनेक युजर्सनी व्हिडीओतील भक्ती पाहून “हर हर महादेव” लिहिले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lord shiva devotees old couple going to kedarnath dhaam video goes viral shravan month ndj