Vishnu Dashavatar Names and Photo: हिंदू धर्म ग्रंथांनुसार विष्णू देवाला सृष्टीचा पालनकर्ता म्हटलं गेल आहे. जेव्हा कधी जगावर खूप मोठं संकट येतं तेव्हा विष्णू अवतार घेऊन त्या संकटाला दूर करतो, असा समज आहे. भागवत पुराणानुसार सतयुग ते कलीयुगापर्यंत विष्णूने एकूण २४ अवतार घेतले आहेत. त्यापैकी १० अवतार आपण ‘दशावतार’ म्हणून ओळखतो. विष्णूचे हे अवतार त्याकाळी खऱ्या आयुष्यात कसे दिसत असतील हे दाखवणारी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माधव कोहली या आर्टिस्टने दशावतार रूपातील विष्णूचे AI इमेजेस आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. तुम्हाला विष्णूचे दहा अवतार कोणते व ते कसे दिसतात हे माहित आहे का? चला आपण प्रत्येक पाहूया…
विष्णूच्या १० रूपांची नावे व फोटो
मत्स्य अवतार
कुर्म अवतार
वराह अवतार
नरसिंह अवतार
वामन अवतार
परशुराम अवतार
राम अवतार
कृष्ण अवतार
बुद्ध अवतार
कल्कि अवतार
दरम्यान, अनेकांनी या फोटोवर कमेंट करून विष्णूच्या दशावतार रूपात गौतम बुद्धांचा समावेश नाही अशी भूमिका मांडली आहे. तर इतरांनी यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.