प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. पण प्रेमात जर कुणी धोका दिला, तर आंधळेपणात कोण काय करील, याचा अंदाज बांधणं कठीण झालं आहे. मध्यप्रदेशच्या राजगडमध्ये एका तरुणाने प्रेमप्रकरणाची रंजक कहाणी समोर आणली आहे. प्रेमीयुगुलांमध्ये क्षुल्लक कारणांवरून मतभेद झाले, की प्रेमाची गोड कहाणी कधी कडवट होईल, हे सांगता येणार नाही. मध्येप्रदेशच्या राजगडमध्ये एका तरुणाने ‘M बेवफा चायवाला’ नावाने चहाची टपरी सुरु केलीय. या चहाच्या टपरीचं एख खास वैशिष्ट्य आहे. ज्यांचा प्रेमभंग झाला असेल, अशा तरुणांना चहामध्ये सूट देण्यात देण्यात आली आहे. या तरुणाने चहाच्या टपरीला असं अनोखं नावं का दिलं आहे, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर
प्रेमाच्या अनेक कहाण्या आतापर्यंत तुम्ही पाहिल्या असतील, मात्र प्रेमात धोका मिळाल्यास टोकाचं पाऊल उचलून जीव धोक्यात टाकणाऱ्या प्रेमीयुगुलांच्या घटनाही समोर आल्या आहेत. मात्र, राजगडमध्ये प्रेमभंग झालेल्या एका तरुणाने खिचलीपूर नगरच्या एका बस स्टॅंडवर चहाची टपरी सुरु केलीय. विशेष म्हणजे या टपरीचं नाव चक्क ‘M बेवफा चायवाला’ असं ठेवण्यात आलं आहे. कारण M अक्षराने या तरुणाच्या पूर्व प्रेयसीचं नाव सुरु होतं. त्यामुळं एक्स गर्लफ्रेंडला डीवचण्यासाठी त्याने चहाच्या टपरीचं नाव अशाप्रकारे ठेवलं आहे.
प्रेमात धोक्या मिळालेल्या लोकांना या दुकानावर चहा स्वस्त मिळतं. मात्र, प्रेमीयुगुलांसाठी चहाची किंमत दुप्पट आहे. ग्राहकांनी दुकानाचं नाव आणि चहाला खूप पसंती दर्शवली आहे. दुकानावर चहा ५ आणि १० रुपयांना मिळतं. प्रेमी युगुलांसाठी चहाची किंमत १० रुपये आहे आणि प्रेमभंग झालेल्यांसाठी चहावर पाच रुपयांचं ऑफर दिलं जातं.
तरुणाने सांगितली प्रेमकहाणी
M बेवफा चायवाला नावाने टपरी सुरु करणाऱ्या तरुणाचं अंतर गुर्जर असं नाव आहे. गुर्जर चहा विक्री करण्यासोबतच बीएचं शिक्षण घेत आहे. चहाच्या टपरीचं नाव M बेवफा चायवाला ठेवण्याचं कारण काय? याबाबत विचारलं असता, अंतर म्हणाला, ” पाच वर्षांपूर्वी लग्नसोहळ्यात आलेल्या एका तरुणीसोबत ओळख झाली. ती तरुणी तिच्या नातेवाईकांच्या लग्नसोहळ्यात आली होती. पहिल्या मुलाखतीनंतर आमच्या दोघांमध्ये मैत्री झाली. दोघांनी एकमेकांचा नंबर शेअर केला. त्यानंचर आमची मैत्री घट्ट झाली.
लग्नाचं आमिष दाखऊन तरुणाला धोका
तिच्याच नावानं दुकान सुरु करावं, अशी अट त्या तरुणीने घातली होती. त्यांच्यात प्रेमसंबंध चांगले असल्याने लग्न करण्यातही काही अडचण नव्हती. दोघांनी लग्नाचे स्वप्नही उराशी बाळगले होते. मात्र, त्या तरुणीचं दुसऱ्या ठिकाणी लग्न जमल्यानंतर त्यांच्या प्रेमसंबंधात मतभेद निर्माण झाले. तरुणीने अंतरसोबत लग्न करायला स्पष्ट नकार दिला होता. ज्या मुलासोबत माझं लग्न जुळलं आहे, त्याच्याकडे सर्वकाही आहे, असं त्या तरुणीनं अंतरला सांगितलं. तू बेरोजगार आहेस. तुझ्याकडे काय आहे? असं तरुणी अंतरला म्हणाली. त्यानंतर दोघांमधले प्रेमसंबंध तुटलं.