भूत आणि झपाटलेले वाडे तुमच्या हृदयाचे ठोके वाढवतात का? केवळ दरवाजाचा कडकडाट किंवा लाइट बल्बचा झगमगाट तुम्हाला घाबरवतो का? की याच्या उलट तुम्ही ण घाबरता भुताचे चित्रपट बघता? घाबरत नसाल तर मग आम्ही तुम्हाला एका अमेरिका आधारित कंपनीच्या नोकरीच्या ऑफरबद्दल माहिती देऊ जे काही भयपट पाहण्यासाठी तुम्हाला काही रक्कम देत आहे. गोंधळलात? चला जाणून घेऊयात याबद्दल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे ऑफर?

यूएस-आधारित कंपनी फायनान्सबझने हॉरर मूव्ही हार्ट रेट अॅनालिस्टच्या नोकरीसाठी १,३००डॉलर्स (अंदाजे ९५,५०० रुपये) जाहीर केले आहेत. नोकरीसाठी व्यक्तीने फिटबिट घातल्यावर भयपट चित्रपट पाहणे आवश्यक आहे, जे त्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके निरीक्षण करेल. निवडलेल्या उमेदवाराला चित्रपट रँकिंगचे स्वातंत्र्य देखील मिळेल, फायनान्सबझने पत्रकार परिषदेत तपशीलवार माहिती दिली.

हे आहेत चित्रपट

आकर्षक वाटतेही ऑफर? मग या भयावह फेस्टमध्ये समाविष्ट असलेले चित्रपट समजेपर्यंत थांबा. अॅमिटीविले हॉरर सारख्या अॅनाबेल आणि स्पाइन-चिलिंग पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटी सारख्या क्लासिक्स पासून, चित्रपट कोणत्याही भयपट शैली प्रेमीसाठी एक मेजवानी आहेत.प्रेस रीलिझमधील वर्णनानुसार, कंपनी काही मार्केट रिसर्च करण्यासाठी अशी असामान्य जागा भरण्याचा विचार करत आहे की ‘उच्च बजेटचे हॉरर चित्रपट कमी बजेटपेक्षा मजबूत भीती दाखवतात की नाही.’

काय मग तुम्हाला आवडेल का हा प्रयोग करायला ?

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Love horror movies then this company will pay you rs 95500 for viewing ttg