प्रेमप्रकरणाचे धागेदोरे कशे जुळतील याचा काही नेम राहिला नाही. प्रेयसीचं लग्न दुसरीकडे झाल्यानंतर पहिला प्रियकर रागाच्या भरात धक्कादायक कारनामे करतो, अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत, बिहारच्या मढोरामध्येही असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बिहारच्या छपरामध्ये पती, पत्नी और वो या सिनेमाच्या कहाणीसारखीच घटना घडली आहे. ही घटना मढोराच्या मिर्जापूर येथील आहे. एका विवाहित महिलेला तिचा पहिला प्रियकर चोरून भेटायचा. पण एक दिवस महिलेच्या पतीनं प्रियकराला पडकलं. त्यानंतर एकच खळबळ उडाली. या धक्कादायक प्रकारानंतर एका व्यक्तीनं गावकऱ्यांच्या मदतीने त्याच्या पत्नीचं लग्न प्रियकरासोबत मंदिरात लावलं. पती-पत्नीच्या नातेसंबंधात पहिल्या प्रियकराने उडी घेतली अन् एकच खळबळ माजली

लग्नाच्या दोन महिन्यानंतर ‘त्याची’ झाली एन्ट्री

मिर्झापूरचा पिकअप ड्रायव्हर विश्वजीतचे चंपापूरमध्ये राहणाऱ्या आरतीसोबत काही महिन्यांपूर्वी प्रेमसंबंध जुळले होते. त्यानंतर दोघांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही सुखाचा संसार थाटला होता. मात्र, लग्नाच्या दोन महिन्यानंतर त्यांच्यात तिसऱ्या एका व्यक्तीनं एन्ट्री केली. आरतीचा पहिला प्रियकर तिला भेटण्यासाठी मिर्झापूरला पोहोचला. त्यानंतर आरती तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी रस्त्याच्या बाजूला गेली. त्याचदरम्यान गावकऱ्यांनी दोघांना पकडलं. या प्रकरणाबाबत आरतीच्या पतीला सांगण्यात आलं. त्यानंतर आरतीचं लग्न पहिल्या प्रियकरासोबत सासरच्या घराजवळच लावण्यात आलं.

Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Man who left home after wife death returns home after 15 years
पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी
Groom from Dubai duped by Instagram bride
दुबईहून लग्नासाठी भारतात आला, इन्स्टाग्रामवरील नवरीनं जबर गंडवला; वरात घेऊन आलेल्या नवऱ्याची अजब फजिती

आणखी वाचा – Pregnancy Tips: लवकरच मिळेल गूड न्यूज! बाळासाठी प्रयत्न करताना या सहा गोष्टींकडे विशेष लक्ष द्या

पतीने पत्नीचं प्रियकरासोबत लावलं लग्न

ब्रहपूर येथे राहणाऱ्या अभिराजने सांगितलं की, तीन वर्षांपासून आरतीसोबत प्रेमसंबंध होते. त्यानंतर मी पळून जाऊन लग्न केलं होतं. पण आज मी खूष आहे. माझं आणि आरतीचं प्रेमसंबंध पुन्हा जुळलं. आरतीच्या पतीला समजावल्यानंतर आम्ही दोघांनी एकत्रित राहणं सुरु केलं. या संपूर्ण घटनेबाबत गावकऱ्यांना कळलं त्यानंतर माझ्या घराजवळ तुफान गर्दी जमा झाली होती.

Story img Loader