क्रिकेट हा असा खेळ आहे जो अनेकांचा आवडता खेळ आहे. जगभरात हा खेळ खूप लोकप्रिय आहे. आपल्याकडे क्रिकेटप्रेमींची काही कमतरता नाही. क्रिकेटप्रेंमीना आता नव्या पद्धतीने क्रिकेट खेळता येऊ शकते. सोशल मीडियावर हटके पद्धतीने क्रिकेट खेळणाऱ्या मुलांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. क्रीडाप्रेमी व्यक्ती नेहमी काहीतरी नवीन शोधत असतात. त्यांना त्यांच्या खेळात सतत नवीन थरार हवा असतो. असा काहीसा प्रकार काही क्रिकेट प्रेमींनी केला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये काही मुले नदीकिनारी क्रिकेट खेळताना दिसतात. अचानक हे मुलं नदीच्या पाण्यात उड्या मारत पोहताना दिसतात. या व्हायरल व्हिडीओची सर्वच चर्चा होत आहे. नेटकऱ्यांनी या खेळाला ‘स्विमकेट’ असे नाव दिले आहे. स्विमिंग आणि क्रिकेट या हे शब्द जोडून हे नाव देण्यात आले आहे.
आता स्विमकेट खेळ कसा खेळायचा?
स्विमकेट हा खेळ पोहणे आणि क्रिकेट या दोन्ही खेळांचा संगम आहे. जर तुम्हाला क्रिकेट खेळायला आणि पोहायला आवडत असेल तर हा खेळ तुम्हालाही आवडेल. हा व्हिडिओ @Madan_Chikna नावाच्या एक्स वापरकर्त्याने शेअर केला आहे. व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर तो लगेच व्हायरल झाला आणि चर्चेला उधाण आले आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आपण हा क्रिकेट + स्विमिंग (जलतरण) खेळ ऑलिम्पिकमध्ये जोडला पाहिजे ज्याला ‘स्विमकेट’ असू म्हणू शकते. हे उत्कृष्ट आहे.”
हेही वाचा – Fact check: ‘डिसीज एक्स’बाबत ‘तो’ दावा खोटा? WHOने केला खुलासा! वाचा नेमकं काय आहे प्रकरण
ही कल्पना सोपी पण कल्पक आहे, कारण खेळाडू क्रिकेटच्या खेळात गुंतले आहेत, परंतु गवताळ खेळपट्टीवर धावण्याऐवजी ते पाण्याच्या तळ्यात पोहताना दिसतात. व्हायरल व्हिडीओमध्ये ‘स्विमकेट’ खेळताना खेळाडू कंबरेपर्यंत पाण्यात बुडालेले दिसत आहे. पारंपारिक पद्धतीने खेळाडू फलंदाजी करताना दिसत आहे पण क्षेत्ररक्षण करताना आणि धावा घेताना या खेळाडूंना पाण्यात उतरावे लागत आहे. ही युक्ती अत्यंत प्रभावशाली आहे.जेव्हा फलंदाज चेंडू मारतो तेव्हा तो पकडण्यासाठी क्षेत्ररक्षक झेप घेत पाण्यात उडी मारतो. पाण्यात उडी मारून तो खेळाडू चेंडू यष्टीरक्षकाकडे फेकतो आणि यष्टीरक्षक धावा घेण्याऱ्या फलंदाजाला बाद करतो. हे सर्व दृश्य पाहणे देखील अत्यंत मनोरंजक आहे. त्यामुळेच या व्हिडीओला अल्पावधीत लोकप्रियता मिळत आहे.
हेही वाचा – तुम्ही खात असलेला ब्रेड कसा बनवला जातो? पाहा फॅक्टरीमधील Video, पुन्हा खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल
व्हिडिओला५० लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे आणि व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. लोकांना क्रिकेटचा हा खेळ खूपच मनोरंजक वाटला. “या क्रिकेट फॉरमॅटसाठी, तुम्ही जलतरणात ऑलिम्पिक चॅम्पियन असणे आवश्यक आहे,” असे एका वापरकर्त्याने लिहिले. “पावसाळी क्रिकेटमध्ये मुंबईचा आत्मा आहे,” दुसऱ्याने लिहिले. ” (खेळासाठी)त्यासाठी पूर्णपणे तयार आहे,” तिसरा म्हणाला.