दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकरच्या हत्याकांडामुळं अवघा देश हादरला आहे. दिवसेंदिवस या घटनेचे थरकाप उडवणारे खुलासे समोर येत आहेत. ही घटना ताजी असतानाच आता उत्तर प्रदेशच्या आजमगढमध्येही धक्कादायक घटनेमुळं खळबळ माजली आहे. पश्चिमपट्टी गावातील एका विहिरीत तरुणीचा मृतदेह विचित्र अवस्थेत सापडला आहे. दोन वर्षांपासून असलेल्या प्रेमसंबंधांनतर तरुणीने लग्नाला नकार दिल्याने नराधम प्रियकराने तरुणीची निर्घृण हत्या केली. प्रिंस असं आरोपीचं नाव आहे. प्रिंसने त्याच्या प्रेयसीचा खून करून तिच्या मृतदेहाचे पाच तुकडे विहिरीत फेकले. त्यानंतर घटनास्थळावरुन सहा किमीच्या अंतरावर तिचं शीर आणि शस्त्र फेकलं. या गंभीर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीनं तपास सुरु केला आणि आरोपी प्रिंसला बेड्या ठोकल्या.

आणखी वाचा : Suryakumar Yadav : टेस्ट क्रिकेटमध्येही टीम इंडियाचा ‘सूर्या’ लवकरच तळपणार, म्हणाला, “आ रहा है, आ रहा है…”

50 Arrested 8 Cases Filed in Parbhani Riot
Parbhani Violence: परभणी प्रकरणात आठ गुन्हे दाखल, पन्नास जणांना अटक
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
man murder over property dispute, Mumbai ,
मुंबई : मालमत्तेच्या वादातून ३६ वर्षीय व्यक्तीची हत्या, दोघांना अटक
fox death Mumbai, Third fox death, fox ,
मुंबई : रेबीजमुळे आणखी एका कोल्ह्याचा मृत्यू, तीन महिन्यांतील कोल्ह्याच्या मृत्यूची तिसरी घटना
Wife killed her husband, woman kills husband with wood
प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्यात वाद; पतीचा खून
Bibvewadi school girl murder, girl murder,
एकतर्फी प्रेमातून कबड्डीपटू शाळकरी मुलीचा खून करणाऱ्या आरोपीला फिर्यादीने ओळखले, न्यायालयीन सुनावणीत फिर्यादीची साक्ष
allu arjun case filled
अल्लू अर्जुनवर का झाला गुन्हा दाखल? प्रीमियरदरम्यान महिलेच्या मृत्यूचं प्रकरण काय आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेयसीचं लग्न दुसरीकडे ठरलं असल्याचं प्रिंसला मान्य नव्हतं. त्यामुळे आरोपी प्रिंसने त्याच्या प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केली. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी प्रिंसला अटक केली आहे. पश्चिमपट्टी गावाजवळ असलेल्या एका विहिरीत तरुणीचा मृतदेह फेकल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. प्रिंसने तरुणीच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते विहिरीत फेकले होते. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गावातील ग्रामस्थांच्या मदतीनं मृतदेहाचे तुकडे बाहेर काढले आणि रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले.

आणखी वाचा – याला म्हणतात प्रेम! फुटपाथवरील जोडप्याचा Viral Video पाहून सारेच झाले भावूक

दोन वर्षांपासून सुरु होतं प्रेमसंबंध

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिंसचं त्याच्या प्रेयसीसोबत दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. फेब्रुवारी महिन्यात पीडित मुलीचं लग्न दुसऱ्या ठिकाणी ठरलं होतं. विदेशात राहणाऱ्या प्रिंसला याबाबत जेव्हा कळलं, त्यानंतर त्याला धक्काच बसला. त्यानंतर प्रिंसने भारतात येऊन प्रेयसीवर लग्नासाठी दबाव
टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, लग्नासाठी प्रेयसीनं नकार दिल्यानंतर प्रिंसने तरुणीचा खून केला. या खूनाच्या प्रकरणात प्रिंसच्या कुटुंबातील काही सदस्यांचा सहभाग होता. पोलिसांनी या प्रकरणात ९ जणांना आरोपी केलं आहे. अन्य आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती आझमगढचे पोलीस अधिक्षक अनुराग आर्य यांनी दिली आहे.

Story img Loader