Lowest Car In The World: कारची परिभाषा काय? कारची परिभाषा म्हटलं तर डोळ्यासमोर येते कारची चार चाक, लाईट्स, हार्न, स्टेअरींग वगैरे. मात्र, ज्या कारला चाकेच नसतील तर तुम्ही त्या कारला काय म्हणणार, आहे ना विचार करण्यासारखी गोष्ट. मात्र, एका सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या कारनं सर्वांनाच चकीत केलं आहे. या कारची चाके दिसत नसून ही कार जमिनिवरुन चक्क सापासारखी सरपटताना दिसत आहे.
सध्या एका कारचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. ही काही सामान्य कार नाही. जगातील सर्वात लहान कार म्हणून तिचा उल्लेख केला जात आहे. ही कार पाहून तुम्हाला ते अर्धवट जमिनीत बुडल्यासारखी वाटेल. जेव्हा ही कार हलते तेव्हा ती जमिनिवरुन सापासारखी रांगताना दिसते. या कारमध्ये टायर्सही दिसत नाहीत. त्यात खिडकीच्या काचेचा खालचा भाग देण्यात आलेला नाही. कार खाली करण्यासाठी तो संपूर्ण भाग काढून टाकण्यात आला आहे. कारच्या बोनेटखालील भाग (जिथे इंजिन राहतो) देखील काढण्यात आला आहे.
(हे ही वाचा: सर्व कंपन्यांचे उडाले होश, फक्त ३ सेकंदात १००kmph चा वेग, BMW ची बाईक देशात दाखल, बुकिंगही सुरू, किंमत…)
कारचा लूक खूपच विलक्षण आहे. ही कार बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया Carmagheddon या यूट्यूब चॅनलवर दाखवण्यात आली आहे. त्याचा मूळ व्हिडिओ १ जून रोजी पोस्ट करण्यात आला होता. कारची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की ती जी व्यक्ती कार चालवत आहे, ते ही दिसणार नाही.
या व्हिडीओच्या शेवटी एक व्यक्ती कारमधून बाहेर येते, त्यानंतर कोणीतरी आतून कार चालवत असल्याचे समजते. ड्रायव्हर आत पडून गाडी कशी चालवतो हेही या व्हिडिओत दिसत आहे.
पाहा हा व्हिडीओ
कारच्या या व्हिडीओ क्लिपला ट्विटरवर ३० दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर यूट्यूबवर पोस्ट केलेल्या व्हिडिओला ३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. काही लोक या आगळ्यावेगळ्या आविष्काराचे कौतुक करत आहेत. पण, अशा वाहनाची गरजच काय, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे.