Jewellery Shop Robbery Video : शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच चालले आहे. कधी कुठे खून, दरोडा, लूटमारीच्या घटना घडतायत, तर कुठे चोरीच्या घटना घडताना दिसताय. यात चोरट्यांची हल्ली इतकी मजल गेली की ते भरदिवसा सराफा दुकानात शिरून चोरी करताना दिसतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये घडली आहे. एक चोर दागिन्यांच्या दुकानात शिरला, सुमारे दीड तास तो बसून खरेदीबाबत बोलत राहिला, त्याने सराफाला बोलण्यात गुंतवले आणि नंतर चार लाख रुपयांचे दागिने घेऊन पसार झाला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अशी झाली चोरी
ही घटना लखनऊच्या भूतनाथ मार्केटमधील आहे. इंदिरानगर सी-ब्लॉकमध्ये राहणारा सिद्धार्थ रस्तोगी ज्वेलर्सचे दुकान चालवतो. रविवारी सिद्धार्थच्या दुकानात एक व्यक्ती आली आणि त्याची चार लाख रुपयांची फसवणूक करून पळून गेली. सिद्धार्थने सांगितले की, रविवारी दुपारी तो दुकानात एकटाच होता, तेव्हा एक व्यक्ती तेथे आली आणि त्याने सोन्याची चेन आणि ब्रेसलेट दाखवण्यास सांगितले. बराच वेळ अनेक साखळ्या पाहिल्यानंतर त्याने दोन चेन आणि दोन बांगड्या निवडल्या.
चोर ८४ मिनिटे सराफाला मूर्ख बनवत राहिला
सिद्धार्थने सांगितले की, त्या चोराने मला चारही वस्तू खरेदी करायचे आहे असे सांगितले. मात्र, यावेळी त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते, म्हणून तो काही पैसे रोख देईल आणि काही तो त्याच्या भावाकडून ऑनलाइन ट्रान्सफर करतो असे सांगत होता. अशाप्रकारे दागिने बघण्याच्या बहाण्याने तो जवळपास ८४ मिनिटे दुकानात बसून होता. यानंतर शेवटी मोबाइलमध्ये काहीतरी करण्याच्या बहाण्याने त्याने चारही दागिन्यांवर हात मारला आणि घेऊन पळून गेला. चोरट्याला पकडण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, दुकानात बसलेला चोरटा फोनवर बोलत पैसे मागण्याचा बहाणा करत होता. यावेळी सराफ सिद्धार्थही त्याच्या फोनमध्ये व्यस्त होता. हीच संधी साधून चोरट्याने चारही दागिने (२ सोनसाखळ्या व २ बांगड्या) घेऊन पळ काढला. ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दिसते की, चोर ज्वेलरी शॉपमध्ये आरामात बसला आहे आणि सराफ फोनमध्ये व्यस्त आहे. सराफाचे आपल्याकडे लक्ष नसल्याचे चोरट्याला दिसताच त्याने दागिने उचलून पळ काढला. यावेळी सराफाने त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. आता पोलिस या प्रकरणाचा तपास करत चोरट्याचा शोध घेत आहेत.