Swiggy Delivery Boy: जर तुम्ही फूड अॅपवरून ऑनलाईन एखादा पदार्थ ऑर्डर केले आणि डिलव्हरी बॉयने तुम्हाला भलताच पदार्थ दिला तर आणि त्यात जर तुम्ही शाकाहारी असाल आणि तुम्हाला चुकून मासंहारी पदार्थ दिला तर? तुमच्यासह असे काही घडले कर अर्थात तुम्हाला खूप मनस्ताप होईल. असाच काहीसा प्रकार एका कुटुंबासह घडला आहे. एका कुटुंबाने फूड अॅपवरून चिली पनीर मागवले होते पण त्यांना चिली चिकन मिळाले. दरम्यान कुटूंबातील ज्या व्यक्तीनी हे चिकन खाल्ले त्यांची तब्येत बिघडली आणि त्यान हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले. कुटुंबाने नॉन व्हेज पाठवणाऱ्या रेस्टॉरंट मालक आणि डिलिव्हरी बॉय विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीमध्ये कुटंबाने दावा केला आहे की, त्यांनी चिली पनीरऐवजी चिली चिकन दिले आणि ते खाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागले. नक्की काय घडले जाणून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – लाकडी चमचे कसे करावे साफ? सोपा उपाय वापरुन पाहा; नव्यासारखी येईल चमक, Video Viral

चिली पनीरऐवजी दिले चिली चिकन

उत्तर प्रदेशमध्ये लखनऊमध्ये एका स्विगी ग्राहकासह हे धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना आशियाना कोतवाली परिसरातील आहे आणि सध्या पोलिस या प्रकारणाचा तापस करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राकेश कुमार शास्त्री यांनी आशियाना येथील चंदर मार्केटमधून चिली पनीर स्विगी या फूड अॅपवरून चिली पनीर ऑर्डर केले. ज्यानंतर स्विगी डिलव्हरी बॉय इमरान याने जेवण दिले. पण जेव्हा चिली पनीरऐवजी चिली चिकन असल्याचे लक्षात आले तेव्हा राकेशची तब्येत खराब झाली. या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी राकेश पोलिसांकडे धाव घेतली आणि त्याने फक्त रेस्टॉरंटविरोधातच नव्हे तर डिलव्हरी बॉयविरोधात तक्रार दाखल केली.

हेही वाचा – तांब्याच्या बाटलीतून पाणी पिताय का? जाणून घ्या कशी करावी साफ, पाहा Viral Video

रेस्टॉरंट आणि डिलिव्हरी बॉय विरोधा दाखल केले तक्रार
राकेश यांना साधारण रात्री ९ च्या सुमारास जेवणाची ऑर्डर दिली होती. जेवण घरी आल्यानंतर लोकांनी ते खायला सुरुवात केली. जेव्हा त्यांना लक्षात आले की हे पनीर नाही तर चिकन आहे तेव्हा त्यांना धक्का बसला. मिळालेल्या माहितीनुसार, हे चिकन खाल्यामुळे कुटुंबातील लोकांची तब्येत बिघडल, उलट्या सुरू झाल्या आणि त्याना हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागले. त्यांनी सांगितले त्यांचे संपूर्ण कुटंब शाकाहारी आहे. त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. स्थानिक इंस्पेक्टरने रेस्टॉरंट आणि डिलिव्हरी बॉय विरोधात तक्रार दाखल केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lucknow family order chilli paneer gets chilli chicken complaint filed against restaurant owner and delivery snk
Show comments