Man’s Dangerous Stunt on Moving Vehicle : सोशल मीडियावर एखादी व्यक्ती लगेच प्रसिद्ध होऊ शकते. मात्र या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी कधी कधी जीव धोक्यात सुद्धा येऊ शकतो. हल्ली प्रत्येक जण प्रसिद्ध होण्यासाठी काहीही करायला तयार होतो. काही तरुण प्रसिद्धीसाठी आपल्या जीवाची जराही पर्वा न करतात असे काही स्टंट करतात, ज्यामुळे त्यांना आयुष्यभराची शिक्षा भोगावी लागते. सध्या असंच काही प्रकरण एका तरुणासोबत घडलं आहे. चालत्या गाडीवर हा तरूण शक्तिमान बनून धोकादायक स्टंट करत होता, पण पुढच्या काही मिनिटात त्याला खाटेवर येऊन उपचार घ्यायची वेळ आली. या तरुणाचा बाईक स्टंट करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय.

ट्विटरवर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधला असल्याचा दावा केला जात आहे. रस्त्यावरून वेगाने धावणाऱ्या एका टॅंकरवर एक मुलगा बसलेला दिसून येतोय. या मुलाने अंगावर कपडे न घालताच रात्रीच्या अंधारात धावत्या टँकरवर पुश अप करायला सुरूवात केली. नंतर तो वेगवेगळे स्टंट करताना दिसतोय. शक्तीमान मालिकेचे टायटल सॉंग देखील बॅकग्राउंडमध्ये वाजताना ऐकू येतं. स्टंट करता करता तो धाडकन खाली कोसळतो. यात तो इतक्या गंभीररित्या जखमी झालाय की यापुढे तो काही दिवस उठू शकणार नाही, असंच दिसतंय.

police registered murder case after body found on mumbai ahmedabad highway
तो अपघात नव्हे तर हत्या; महामार्गावरील अपघाती मृत्यूचे गूढ उकलले
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Terrifying video of man crossing railway track fell down from barricade accident video viral
“एक मिनिट वाचवण्याच्या नादात सर्व संपून जाईल…” रेल्वे रुळ ओलांडताना बॅरिकेडवर चढला अन् पुढे जे झालं ते पाहून बसेल धक्का, थरारक VIDEO
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Mother-Daughter Duo Gets Into Ugly Quarrel With Man Objecting To Wrong Parking In Delhi
VIDEO : “माझ्या १०० चुका, तरी तूच आत जाणार”, मायलेकीची तरुणाला धमकी, दिल्लीच्या रस्त्यावर पार्किंगवरून राडा
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”

आणखी वाचा : Lalit Modi-Sushmita Sen च्या नात्यावर जबरदस्त मीम्सचा वर्षाव, वाचून तुम्ही सुद्धा पोट धरून हसाल

या टॅंकरच्या मागून आलेल्या एका गाडीमधून हा घटनेचं दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलंय. हा व्हिडीओ लखनऊ पोलीस अधिकारी श्वेता श्रीवास्तव यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना एक कॅप्शनही देण्यात आली आहे ज्याद्वारे पोलिसांनी लोकांना असे स्टंट करू नये असे आवाहन केले आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “गोमतीनगर, लखनऊ येथील काल रात्रीची घटना – शक्तीमान बनायला जात होता, आता काही दिवस उठूही शकणार नाही! आवाहान: कृपया असे जीवघेणे स्टंट करू नका!” असं या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलंय.

आणखी वाचा : ट्रक चालवणाऱ्या महिलेची दिलखेचक स्माईल पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Zomato आणि Swiggy च्या डिलिव्हरी बॉयमधली ही बॉण्डिंग पाहून तुम्ही सुद्धा म्हणाल, ‘हीच खरी मैत्री’

व्हिडीओमध्ये पुढे जे दृश्य दिसतंय त्यात मुलगा जखमी अवस्थेत खाटेवर पडलेला दिसतोय आणि त्याला अनेक गंभीर दुखापतीही झाल्या आहेत, हे स्पष्ट आहे. या स्टंटमुळे मुलाचा नंतर अपघात होतो, ज्याचा परिणाम व्हिडीओमध्ये दिसतोय. विनाकारण स्टंटबाजी करून खतरों के खिलाडी म्हणून रस्त्यावर फिरणाऱ्या तरूणांनी या व्हिडिओतून धडा घेण्याची गरज आहे, असं देखील काही युजर्स म्हणत आहेत.

Story img Loader