लखनऊमध्ये एका महिला डॉक्टरने दिवाळीच्या दिवशीच पणत्या विक्रेत्यांचे मोठे नुकसान केल्याच्या बातमीने सर्वत्र खळबळ माजवली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या महिलेच्या घरासमोर छोट्या व्यावसायिकांनी पणत्या विक्रीची दुकाने मांडली होती. त्यामुळे वाहतूकीचा सामना करावा लागत असल्याने महिला डॉक्टरला राग आला आणि त्या रागातून तिने घरातील बॅट आणून दुकानातील पणत्या, दिवे फोडून टाकले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसत आहे की, डॉक्टर महिला बॅटने मातीची भांडी, दिवे तोडत आहे. तर दुकानदारांना धमकावत आहे. या प्रकरणी गोमतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गोमतीनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनेशचंद्र मिश्रा यांनी सांगितले की, या महिलेविरूद्ध तोडफोड आणि धमकावण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

( हे ही वाचा: भररस्त्यात शाळकरी मुलींची तुंबळ हाणामारी; एकीने झिंज्या उपटल्या तर दुसरीने बेल्ट काढत…पाहा Viral Video)

( हे ही वाचा: शिकार सोडून सिंह-सिंहीणीची जुंपली जोरदार लढाई; थरारक झुंजीचा Viral Video एकदा पाहाच)

ही महिला घरासमोर दुकान लावण्यास विरोध करत होती

निरीक्षक दिनेश चंद्र मिश्रा यांनी सांगितले की, पत्रकारपुरम येथील रहिवासी असलेली ही महिला गाड्यावरील दुकानदारांना शिवीगाळ करताना आणि दुकानाची तोडफोड व्हिडिओ व्हायरल झाला होता.​​​​​​ पत्रकारपुरम चौकीच्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. यानंतर महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Story img Loader