लाल साडी किंवा लेंहेंगा परिधान करणे नववधु होणे हे प्रत्येक तरुणीचे स्वप्न असते. कल नववधूच्या फॅशनच्या बाबतीत सब्यसाची मुखर्जी हे नाव खऱ्या अर्थाने घराघरात प्रसिद्ध झाले आहे कारण त्यांच्या उत्कृष्ट डिझाईन्स वधू-वरांना आवडतात. या डिझाईन्स त्यांना त्याच्या पारंपारिक मुळाशी जोडून ठेवतात आणि उत्कृष्ट डिझाइन्स त्यांना नव्या फॅशनसह जोडतात. प्रसिद्ध सेलिब्रिटींपासून उद्योगपतीपर्यं सर्वच जण सब्यसाची कलेक्शन परिधान करताना दिसतात.पण याशिवाय सब्यसाची आपल्या सुंदर डिझाइन्सद्वारे अनेक तरुणांना काहीतरी नवीन डिझाईन करण्याची प्रेरणा देते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलीकडे इनोव्हेशन फॉर चेंज एक ना-नफा संस्थेने सब्यसाचीच्या आयकॉनिक कलेक्शनमधून प्रेरणा घेऊन वधूचे पोशाख तयार करत वंचित मुला-मुलांचा फॅशन शो सादर केला. एनजीओने जारी केलेला व्हिडिओ तरुण डिझाइनर त्यांच्या स्वत: च्या निर्मितीचे मॉडेलिंग करताना दिसत आहे आणि सब्यसाचीच्या प्रसिद्ध शैलीमध्ये हा शो सादर करत आहेत

“आम्ही लखनौ स्थित एनजीओ आहोत जे ४००+ झोपडपट्टीतील मुलांसह काम करत आहेत आणि या मुलांना मोफत शिक्षण देतात, हे ड्रेस आमच्या विद्यार्थ्याने डिझाइन केले होते आणि जे विद्यार्थी यामध्ये काम करत आहेत ते सर्व झोपडपट्टीतील आहेत,” एनजीओने कमेंट विभागात लिहिले.

हेही वाचा –नारळाच्या शेंड्या काढून वैतागलात? ‘हा’ सोपा जुगाड एकदा वापरा अन् झटक्यात होईल काम

“ही मुले अत्यंत गरीब आणि असहाय कुटुंबातून आलेली आहेत. ते स्थानिक लोकांकडून आणि आसपासच्या लोकांकडून धर्मादाय म्हणून मिळणाऱ्या सर्व कपड्यांचे वर्गीकरण करून त्यांच्या सर्जनशीलतेद्वारे डिझायनर कपडे तयार करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी अलीकडेच एक नवीन @sabyasachi व्हिडिओ पाहिल्यानंतर असे काहीतरी करण्याचा निर्णय घेतला,” NGOने कॅप्शनमध्ये सांगितले.

एनजीओने१५ वर्षांच्या मुलांनी शूट केलेला व्हिडिओ देखील शेअर केला आहे ज्यांनी असे म्हटले आहे की,”ते दररोज त्यांचे कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत. “तुम्ही रीलमध्ये पाहत असलेल्या मुली व्यावसायिक मॉडेल नसून माळीण बस्तीमध्ये राहणाऱ्या मुली आहेत ज्या सुमारे १२ ते १७ वर्षांच्या आहेत आणि सर्व कपडे या मुलांनीच तयार केले आहेत,” असे त्यात म्हटले आहे.

, एनजीओने व्हिडिओमागील हृदयद्रावक कथा देखील शेअर केली आहे. “हे फक्त एक पोस्ट नाही. ही मुलं जुन्या कपड्यांपासून हे डिझायन कपडे तयार करतात. हे सर्व झोपडपट्टीत राहतात, त्यामुळे ही मोठी गोष्ट आहे.

व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या व्हिडीओने सब्यसाचीचे लक्ष वेधून घेतले.व्हिडीओ पाहिल्यानंतर सब्यसाचीच्या अधिकृत खात्यावरून हार्ट इमोजी पोस्ट केले आणि त्यानी स्वतःच्या इंस्टाग्रामवर “आणि विजेता आहे…” ही पोस्ट पुन्हा शेअर केली.

इतरांनी त्यांचे कौतुक करत कमेंट केल्या. बॉलीवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने हार्ट इमोजीसह कमेंट केली. डायरच्या माजी उपाध्यक्ष कल्याणी साहा चावला यांनी टिप्पणी केली, “हे आश्चर्यकारक आहे.”

दुसऱ्या व्यक्तीने लिहिले, “मी फक्त या किशोरवयीन मुलांना एक मॉडेल बनवताना पाहत आहे, फक्त त्यांना खूप स्वप्ने देतात. हे प्रदर्शन नाविन्यपूर्ण आहे. आणि कपडे कोणी परिधान केले तरीही ते आश्चर्यकारक दिसतात. त्यामुळे छान आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lucknow ngo helps underprivileged children make sabyasachi inspired clothes the designer reacts snk