Lucknow Girl Beating Boy In Mall: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगी मुलाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसतेय. ही मुलगी नशेत होती. ती नशेत इतकी धुंद झाली होती की पायातली चप्पल काढून मारायलाही तिने कमी केलं नाही. आता कारण काहीही असो, पण मुलीने या मुलाची केलेल्या धुलाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ लखनऊमधला आहे. काही दिवसांपूर्वी लखनऊमधल्या एका मुलीने रस्त्यावर एका कॅब चालकाला मारहाण केल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा वेगळ्या लखनऊ गर्लच्या मारहाणीचा व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये एका मुलीने चक्क मॉलमध्येच एका मुलाला लाथा-बुक्क्यांनी चोपून काढलंय. लखनऊच्या समिट बिल्डिंगमध्ये हा प्रकार घडलाय. या मुलीसोबत आणखी एक मुलगी तिला थांबवताना दिसत आहे. दुसरी मुलगी तिला अडवताना दिसतेय पण ती काही ऐकायचं नाव घेत नाही. ती पुन्हा त्या तरूणाकडे जाते आणि मुलाला जोरात कानशिलात मारते. त्यानंतर त्याचं शर्ट खेचून त्याला आपल्या हातांनी मारते. मारामारीदरम्यान तरुणीचा पारा इतका चढतो की बाजूला असलेले फ्लॉवर पॉटच त्या मुलाच्या डोक्यावर फोडते. मुलाच्या पाठीत, पायावर आणि डोक्यावर तिने कुंडी फोडली.

आणखी वाचा : विमानात प्रवासी लक्ष देत नव्हते म्हणून या फ्लाईट अटेंडंट्सने असं काही केलं की…; पाहा VIRAL VIDEO

@himansh79681270 नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओमध्ये ज्या पद्धतीने मुलीने मुलाची धुलाई केलीय ती पाहून मुलगा पुढचे काही दिवस उठू शकणार नाही, असं दिसतंय. मुलगी इतकी आक्रमक झाली अखेर तिथल्या सुरक्षारक्षकांना मध्यस्थी करावी लागली आणि कसंबसं करून ते मुलाल त्या मुलीच्या तावडीतून सोडतात. मुलगी कॅफेच्या आत जाते आणि मुलगा बाहेर जाताना दिसतोय.

आणखी वाचा : पत्नीला आधी ओढत नेले आणि नंतर खांबाला बांधून मारहाण केली, पतीच्या क्रूरतेचा VIDEO VIRAL

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : चालत्या मेट्रोत मुलगी अचानक डान्स करू लागली, प्रवासी बघतच राहिले

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओची पोलिसांनीच दखल घेतली आहे. या घटनेच्या वेळी पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र त्यानंतरही इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडीओच्या आधारे तरुण आणि तरुणीचा शोध सुरू आहे. पोलिसांनी तेथील बारच्या बाऊन्सरची चौकशी केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lucknow summit building watch viral video on social media of girl thrashes boy fiercely of scuffle prp