Young Men Dance A top Vehicle’s Roof :आयुष्य म्हणजे खेळ नाही. अनेक लोक मिळालेल्या आयुष्याची पर्वा न करता बेपर्वांने वागतात, चुकीच्या गोष्टी करतात, व्यसनाच्या आहारी जातात आणि स्वत:बरोबर इतरांचा जीव धोक्यात टाकतात. अनेकदा लोक दार पिऊन गाडी चालवतात, भरधाव वेगाने कार चालवत स्टंटबाजी करतात ज्यामुळे अपघात होऊ शकतो. वाहतूक नियमांची त्यांना पर्वा नसतेच पण स्वत:च्या किंवा इतरांच्या जीवाची देखील पर्वा करत नाही. असाच काहीसा प्रकार लखनऊच्या गोमती नगरमध्ये घडल आहे.
कारवर उभे राहून नाचले
सोशल मीडियावर धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तरुणांचा एक गट सार्वजनिक रस्त्यांवर कार चालवताना धोकादायक स्टंट करताना दिसत आहे. आता व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कार भरधाव वेगाने धावत आहे आणि धोकादायकरित्या कार चालवताना दिसत आहे. तस एका व्हिडीओमध्ये काही पुरुष त्यांच्या कारवर उभे राहून नाचत आहेत.
दारू पिऊन भररस्त्यात घातला धिंगाणा
व्हिडीओमध्ये, शहरातील वर्दळीच्या निवासी आणि व्यावसायिक क्षेत्र असलेल्या गोमती नगरच्या मुख्य रस्त्यांवर रात्री उशिरा अनेक कार वेगाने धावताना दिसत आहेत. प्रत्यक्षदर्शींनी स्थानिक प्रकाशनांना सांगितले की,”बेपर्वा वाहन चालवल्याने पादचाऱ्यांना आणि इतर वाहनचालकांना गंभीर धोका निर्माण झाला आहे.”
व्हिडिओ येथे पाहा:
पोलिसांनी केली कारवाई
परिसरातील स्थानिकांनीही संताप व्यक्त केला आणि म्हटले की,”अशा प्रकारच्या कारवाया आता वारंवार होत आहेत. स्थानिकांची चिंता आणि व्हायरल फुटेजची दखल घेत, लखनऊ पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी मंगळवार, ८ एप्रिल रोजी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर जाऊन लिहिले की, “या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे, सीसीटीव्ही/व्हायरल व्हिडिओद्वारे ओळख पटवली जात आहे, ओळख पटल्यानंतर आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल.”
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही पुष्टी केली की, “वाहनांचा माग काढण्यासाठी आणि बेपर्वाईने केलेल्या कृत्यात सहभागी असलेल्यांची ओळख पटविण्यासाठी पथके परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहेत. अधिकाऱ्यांनी नागरिकांना तपासात मदत करण्यासाठी कोणतीही संबंधित माहिती शेअर करण्याचे आवाहन केले आहे. वृत्तानुसार, सार्वजनिक ठिकाणी लोकांची जीव धोक्यात टाकणे आणि बेपर्वाईने वाहन चालवणे यासारख्या कलमांखाली दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.